Vaibhav Suryavanshi : 11 चेंडूत ठोकल्या 54 धावा! वैभव सूर्यवंशीने उद्ध्वस्त केली 'लंका', टीम इंडियाची फायनलमध्ये धडक
10 दिवसांपूर्वी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 मेगा लिलावात करोडपती बनल्यानंतर चर्चेचा विषय बनला आहे.
India beat Sri Lanka to reach final U19 Asia Cup 2024 : 10 दिवसांपूर्वी 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 मेगा लिलावात करोडपती बनल्यानंतर चर्चेचा विषय बनला आहे. अंडर-19 आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी होता. गेल्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीने यूएईचा आणि आता उपांत्य फेरीतही श्रीलंका संघाचा धुव्वा उडवला.
टीम इंडियाने श्रीलंकेचा केला पराभव
भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत 19 वर्षांखालील आशिया कपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली आणि संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. 47व्या षटकातच श्रीलंकेचा डाव 173 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसरा उपांत्य फेरीचा सामना सहज जिंकला. टीम इंडियाने श्रीलंकेचा 22 षटकांत पराभव केला.
A memorable day and innings for Vaibhav Suryavanshi as he steers India U19 to a commanding win and is also awarded the Player of the Match 🏆
— BCCI (@BCCI) December 6, 2024
Scorecard ▶️ https://t.co/016Tkd99kt#TeamIndia | #ACC | #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/pRLZcNkYR2
वैभव सूर्यवंशीने ठोकले सलग दुसरे अर्धशतक
13 वर्षीय वैभव सूर्यवंशी स्पर्धेच्या सुरुवातीला फ्लॉप दिसला. मात्र अखेरच्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत नाबाद 76 धावा करत संघाला उपांत्य फेरीत नेले. आता वैभवने श्रीलंकेविरुद्धही बॅटिंगने खळबळ उडवून दिली. या खेळाडूने 36 चेंडूत 67 धावांची खेळी खेळली. ज्यात सूर्यवंशीने 5 षटकार आणि 6 चौकारांच्या जोरावर 54 धावा केल्या. दुसरीकडे त्याला म्हात्रेची साथ लाभली ज्याने 34 धावांची खेळी केली.
VAIBHAV SURYAVANSHI SMASHED A FIFTY IN JUST 24 BALLS IN THE SEMIS OF U19 ASIA CUP. 🤯 pic.twitter.com/JszcixccJO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
भारताने अंतिम फेरी गाठली
श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत अंडर-19 टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. हा सामना 8 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशसमोर पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. बांगलादेश संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. भारत आणि बांगलादेशचे संघ 8 डिसेंबरला विजेतेपदाच्या लढतीत आमनेसामने येतील.
हे ही वाचा -
Yashasvi Jaiswal Duck : पिंक बॉल कसोटीत भारताचे 2 सलामीवीर शून्यावर आऊट, एकाचं करिअरही संपलं