Vaibhav Suryavanshi News : 331.58 चा स्ट्राइक रेट अन् वैभव सूर्यवंशीचा तांडव! फक्त 14 चेंडूत ठोकले अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचाही धुमाकूळ
DY Patil T20 Cup News : आयपीएलपूर्वी मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत काही युवा खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत.

Vaibhav Suryavanshi DY Patil T20 Cup : भारतीय क्रिकेट संघातील अनेक दिग्गज खेळाडू सध्या टी-20 वर्ल्ड कप 2026मध्ये व्यस्त आहेत. पण स्पर्धा संपताच इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामाची चाहत्यांना आतुरता लागली आहे. मात्र आयपीएलपूर्वी मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत काही युवा खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत. त्यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अवघ्या 15 वर्षांचा उदयोन्मुख सलामीवीर वैभव सूर्यवंशी आहे.
Read the score, find it unbelievable. Read the name, call it business as usual 🙏😂 pic.twitter.com/cSs9mNwX7a
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) February 26, 2026
वैभवची तुफानी फलंदाजी... (Vaibhav Suryavanshi DY Patil T20 Cup News)
डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळताना इंडियन नेव्हीविरुद्धच्या सामन्यात वैभवने अक्षरशः तुफानी फलंदाजी करत केवळ 14 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. इंडियन नेव्हीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 220 धावांचे आव्हान उभे केले होते. त्याचा पाठलाग करताना डीवाय पाटील ब्लू संघाकडून यश धुल आणि वैभव सूर्यवंशी ही सलामीची जोडी मैदानात उतरली.
331.58 चा स्ट्राइक रेट अन् वैभव सूर्यवंशीचा तांडव!
वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने केवळ 14 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करत प्रेक्षकांना थक्क केले. एकूण 19 चेंडूत 63 धावांची खेळी करताना त्याने 7 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 331.58 इतका होता. वैभवच्या या स्फोटक खेळीमुळे डीवाय पाटील ब्लू संघाने 19.1 षटकांत 5 गडी गमावत लक्ष्य गाठले.
अर्जुन तेंडुलकरचाही धुमाकूळ.... (Arjun Tendulkar DY Patil T20 Cup News)
या सामन्यात वैभवव्यतिरिक्त अर्जुन तेंडुलकरनेही फलंदाजीत आपली छाप सोडली. त्याने 29 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. अखेरपर्यंत क्रीजवर ठाम उभा राहत त्याने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी आयपीएल 2026 हंगाम दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
Arjun Tendulkar hitting sixes for fun in the DY Patil tournament.
— Rupesh Kumar (@drona_17) February 26, 2026
He can give finishing touches for LSG in IPL.
After coming to LSG , he becomes a different beast 🥵 pic.twitter.com/hwHTiQwaQz
हे ही वाचा -





















