एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 

Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियाच्या अंडर 19 संघातील खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीची परीक्षा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दहावीची लेखी परीक्षा 17 फेब्रुवारीपासून सुरु  होत आहे. 

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा आक्रमक खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) दहावीची परीक्षा यंदा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांनी ही माहिती दिल्याचं सांगितलं जातंय. वैभव सूर्यवंशी दहावीची परीक्षा देणार की नाही यासंदर्भातील चर्चांना यामुळं ब्रेक लागला आहे.

Vaibhav Sooryavanshi : वैभव दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार

वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या ताजपपूरमधील रहिवासी आहे. मॉडेस्टी स्कूलमध्ये तो शिक्षण घेतोय. वैभव सूर्यवंशी दहावीला असून त्याची परीक्षा 17 फेब्रुवारीला सुरु होणार असून 11 मार्चला संपणार आहे. मात्र, वैभव सूर्यवंशी परीक्षा देणार नसल्याचं समोर आलं आहे. 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीनं  भारताकडून अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप आणि भारत अ संघाकडून क्रिकेट खेळलं आहे, ज्यामुळं त्याला दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी कमी  वेळ मिळाल्याची माहिती आहे. 

वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी हिंदूस्थान टाइम्स सोबत बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले की तो (वैभव) दहावीची परीक्षा देणार नाही. तो सध्या नागपूरमध्ये असून आगामी आयपीएलची तयारी करत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत तो असून प्री सीझन कॅम्पमध्ये सहभागी झालाय, असं मनीष ओझांनी म्हटलं. आयपीएल 26 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून तो महत्त्वाचा फलंदाज आहे. 

मॉडेस्टी स्कूल ताजपूरचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी म्हटलं की वैभव सूर्यवंशीचा परीक्षा अर्ज दाखल करण्यात आला असून प्रवेशपत्र देखील जारी करण्यात आलं आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल हे वैभव सूर्यवंशीसाठी परीक्षा केंद्र होतं. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या लेकासाठी क्रिकेट हे पहिलं प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे. 

संजीव सूर्यवंशी यांच्या मते वैभवचं पूर्ण लक्ष्य क्रिकेटवर आहे. तो प्रशिक्षणात व्यस्त असून तो 17 फेब्रुवारीपासून सुरु होणारी परीक्षा देणार नाही. तो पुढील वर्षी परीक्षा देईल, असं संजीव सूर्यवंशी म्हणाले. याबाबतचं वृत्त ईटीव्ही भारतनं दिलं आहे. 

दरम्यान, वैभव सूर्यवंशीनं नुकत्याच पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 80 बॉलमध्ये 175  धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनं या वर्ल्ड कपमधील 7 मॅचमध्ये 439 धावा 62.71 च्या सरासरीनं आणि 169.49 च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वैभवच्या नावावर नोंद झाला आहे. 

आयपीएलच्या 2025 हंगामात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयलन्सनं 1.1 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. वैभवनं गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या हंगामात 7 सामन्यात 252  धावा केल्या होत्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget