एक्स्प्लोर

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीने टीम इंडियासमोरच मोठं संकट, संजू, अभिषेक की ईशान, प्लेईंग 11 मधून कोण OUT, कोण IN?

Vaibhav Sooryavanshi T20 Selection Team India playing XI : आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अखेर भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे.

Vaibhav Sooryavanshi T20 Selection Team India playing XI : आयपीएल 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीला अखेर भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात या 15 वर्षीय युवा फलंदाजाची निवड करण्यात आली असून आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास कोणाला बाहेर बसावे लागणार?  

वैभव सूर्यवंशी हा सलामीवीर आहे. त्याने आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याला मधल्या फळीत खेळवण्याचा धोका पत्करेल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याला सलामीलाच उतरवले जाऊ शकते.

वैभव सूर्यवंशी कोणाच्या जागी खेळणार? (Vaibhav Sooryavanshi Team India playing XI)

सध्या भारतीय टी-20 संघात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामीची जोडी आहे. अभिषेक शर्मा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दमदार कामगिरी करत असल्याने त्याची जागा धोक्यात असल्याचे दिसत नाही. त्यामुळे वैभवला संधी द्यायची झाल्यास सर्वात मोठा फटका संजू सॅमसनला बसू शकतो.

संजू सॅमसनला संघ व्यवस्थापन मधल्या फळीत खेळवण्याचा पर्याय नक्कीच उपलब्ध आहे. मात्र संघ संयोजन, विकेटकीपरची भूमिका आणि इतर फलंदाजांची उपस्थिती पाहता त्याला बाहेर बसवण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. विशेषतः जर संघाला भविष्यासाठी वैभवसारख्या युवा खेळाडूला जास्तीत जास्त सामने देण्याची इच्छा असेल तर संजूला काही सामने बाकावर बसावे लागू शकतात.

आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार कामगिरी (Vaibhav Sooryavanshi IPL 2026) 

वैभव सूर्यवंशीची निवड केवळ भविष्यातील गुंतवणूक म्हणून झालेली नाही. त्याने आयपीएल 2026 मध्ये केलेली कामगिरी त्याला थेट प्लेइंग इलेव्हनसाठी दावेदार बनवते. या हंगामात त्याने 16 डावांत तब्बल 776 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राइक रेट 237.30 इतका अविश्वसनीय होता. त्याने विराट कोहली, शुभमन गिल आणि केएल राहुल यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत ऑरेंज कॅप जिंकली. याशिवाय वैभवने संपूर्ण स्पर्धेत 72 षटकार ठोकले. त्यामुळे त्याने ख्रिस गेलच्या 59 षटकारांच्या विक्रमालाही मागे टाकले. त्याच्या आक्रमक शैलीमुळे पॉवरप्लेमध्ये भारताला जलद सुरुवात मिळू शकते, ही बाबही संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत जर वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो भारताकडून खेळणारा सर्वात युवा पुरुष क्रिकेटपटू ठरेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये वैभव सूर्यवंशीवर सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील. निवड समितीने संधी दिली गौतम गंभीर देणार का?, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (India Squad For Ireland and England Series)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ (INDIA SQUAD FOR England SERIES)

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

हे ही वाचा -

Suryakumar Yadav News : कर्णधारपद गेलं, संघातूनही डच्चू...; सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया व्हायरल; नेमकं काय म्हणाला? सगळ्यांचं लक्ष वेधलं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
Rohit Sharma Retirement Ind vs Eng 3rd ODI: रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
रोहित शर्माचे आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा वनडे सामना?, गेल्या 24 तासांत काय काय घडतंय?
Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget