India vs West Indies 1st T20 Playing XI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच संपली. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. आता दोन्ही संघांमध्ये 6 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका रंगणार आहे. वनडे मालिकेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी केलेली आक्रमक कामगिरी पाहता टी-20 मालिकेतही भारतीय संघासमोर पाहुण्या संघाकडून कडवी झुंज अपेक्षित आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असावी, याबाबत माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली. विशेष म्हणजे, या संघातून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला त्याने बाहेर ठेवले आहे.

Continues below advertisement

संजू-अभिषेक सलामीला

आकाश चोप्राच्या मते, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतासाठी डावाची सुरुवात करावी. वैभव सूर्यवंशी संघात असला तरी सलामीची जबाबदारी तो अभिषेक आणि संजूलाच देईल, असं आकाशने स्पष्ट केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघात वैभवचा समावेश होता. मात्र, तिथे त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसनची कामगिरीही फारशी प्रभावी राहिलेली नाही. तरीही आकाशने संजूवर विश्वास दाखवत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे.

Continues below advertisement

इशान तिसऱ्या क्रमांकावर, श्रेयसकडे नेतृत्व

आकाश चोप्राने इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर, तर कर्णधार श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी ठेवले आहे. तिलक वर्माला पाचव्या क्रमांकाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर शिवम दुबेला सहाव्या क्रमांकावर स्थान देण्यात आलं आहे. हार्दिक पांड्या उपलब्ध नसल्यामुळे नितीश कुमार रेड्डीला संघात महत्त्वाची भूमिका मिळू शकते, असं आकाशचं मत आहे. अक्षर पटेललाही त्याने संघात स्थान दिलं असून, त्यामुळे भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजीला आणखी मजबुती मिळेल.

कुलदीपला खेळवण्याच्या बाजूने

गोलंदाजीमध्ये आकाश चोप्राला कुलदीप यादवला खेळताना पाहायला आवडेल. फिरकीची जबाबदारी कुलदीप आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंहचं स्थान जवळपास निश्चित मानत आकाशने त्याला आपल्या संघात घेतलं आहे. मात्र, दुसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या निवडीबाबत तो साशंक आहे. प्रिन्स यादव आणि मयंक यादव यांच्यापैकी एकाला संधी देण्याची त्याची पसंती आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव/मयंक अग्रवाल.

टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ (India squad for vs West Indies T20 series:) :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलत वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव.

भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेचे वेळापत्रक (India vs West Indies T20 series Schedule) :

  • 6 ऑक्टोबर - पहिला टी-20 सामना - एकना स्टेडियम, लखनौ - सायंकाळी 7:00 वाजता
  • 9 ऑक्टोबर - दुसरा टी-20 सामना - जेएससीए स्टेडियम, रांची - सायंकाळी 7:00 वाजता
  • 11 ऑक्टोबर - तिसरा टी-20 सामना - होळकर स्टेडियम, इंदूर - सायंकाळी 7:00 वाजता
  • 14 ऑक्टोबर - चौथा टी-20 सामना - राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद - सायंकाळी 7:00 वाजता
  • 17 ऑक्टोबर - पाचवा टी-20 सामना - एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू - संध्याकाळी 7:00 वाजता

हे ही वाचा -

IND vs WI 1st T20 : टीम इंडियाच्या सामन्याची वेळ बदलली! वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना किती वाजता होणार सुरू?, जाणून घ्या A टू Z