एक्स्प्लोर

Sanjay Manjrekar on Vaibhav Sooryavanshi : मी असतो तर संघातून बाहेर फेकलं असतं...; वैभव सूर्यवंशीच्या त्या कृत्यावर मांजरेकर भडकले; नको नको ते बोलले

Sanjay Manjrekar on Vaibhav Sooryavanshi Controversy : युवा भारतीय क्रिकेट सुपरस्टार वैभव सूर्यवंशी सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे.

Sanjay Manjrekar on Vaibhav Sooryavanshi Controversy : युवा भारतीय क्रिकेट सुपरस्टार वैभव सूर्यवंशी सध्या चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. सोमवारी श्रीलंका अ संघाकडून सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाचा पराभव झाल्यानंतर, मैदानावरच त्याचा एका श्रीलंकन ​​क्रिकेटपटूसोबत वाद आणि झटापट झाली. दंबुला येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्याच्या शेवटी, वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचा विशेन हलाम्बागे यांच्यात मैदानावरच बाचाबाची झाली. वातावरण खूपच तणावपूर्ण झाले होते. श्रीलंका अ संघाचा यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाने हस्तक्षेप करून त्या दोन खेळाडूंना वेगळे केले. दरम्यान, मैदानावर झालेल्या वादावर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मैदानावर कोणत्याही प्रकारचा शारीरिक संघर्ष किंवा धक्काबुक्की अजिबात सहन केली जाऊ शकत नाही आणि अशा वर्तनावर कडक कारवाई झालीच पाहिजे," असे स्पष्ट मत मांजरेकर यांनी मांडले आहे.

नेमकी काय घडली घटना?

हा वाद तिंरगा मालिकेच्या चौथ्या सामन्यादरम्यान झाला. या अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका अ संघाने सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव केला. सामना संपल्यानंतर टीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. भारताचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी श्रीलंकेच्या खेळाडूंच्या दिशेने गेला आणि त्याने श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलाम्बागे याला जोरात धक्का दिला.

वादामागचे कारण काय होते?

सामन्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, विशेन हलाम्बागे संपूर्ण मालिकेत वैभववर सतत Sledging करत होता. रिपोर्ट्सनुसार, हलाम्बागेने वैभवला डिवचत म्हटले होते की, "घरी जा, हा आयपीएल सामना नाही." या उकसावण्यामुळे वैभवचा संयम सुटला. सामना संपल्यावर हलाम्बागे जेव्हा वैभव आणि सूर्यांश शेडगे यांच्याजवळ आला, तेव्हा वाद आणखी वाढला. अखेर श्रीलंकेचा यष्टिरक्षक निरोशन डिकवेला याला मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला.

संजय मांजरेकर यांचे मोठे वक्तव्य

संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देताना लिहिले की, "जर मी भारत अ संघाचा प्रशिक्षक (Coach) किंवा व्यवस्थापक (Manager) असतो, तर अफगाणिस्तान अ विरुद्धच्या पुढच्या सामन्यात वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नसते. मैदानावर शारीरिक ताकद दाखवणे किंवा कोणाला धक्का देणे पूर्णपणे चुकीचे आहे, मग समोरच्याने कितीही उचकवले तरी चालणार नाही. त्याला हा धडा मिळणे गरजेचे होते."

मालिकेत वैभवची सुमार कामगिरी

एकीकडे हा वाद सुरू असताना, दुसरीकडे या स्पर्धेत वैभवला आपल्या बॅटने विशेष कमाल दाखवता आलेली नाही. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरत आहे. अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 28 चेंडूत 38 धावा केल्या. या स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये त्याने 14, 44, 21 आणि 38 अशा धावा केल्या आहेत. वैभव सध्या फॉर्मात नसला तरी नुकतीच त्याची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ संघात निवड झाली आहे. या निवडीसह तो भारतासाठी निवडला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा ऐतिहासिक विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

हे ही वाचा -

IND VS AFG 2nd ODI : ज्यावेळी वाटत होतं आज रोहित इतिहास रचणार, त्याच क्षणी घात झाला! राशिदच्या त्या गुगलीने हिटमॅनला कसं फसवंलं? पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget