Vaibhav Sooryavanshi VIDEO : भारतीय क्रिकेटमधील युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर एअरपोर्टवरील एका व्हायरल व्हिडीओमुळे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वैभव एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्याने चेहऱ्यावर काळा मास्क लावला असून टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये तो दिसतो. विशेष म्हणजे, त्याच्या हातात टॉवेलही आहे आणि तो त्याच टॉवेलने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Continues below advertisement

व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया युजर्समध्ये चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी वैभवच्या या निरागस वागण्यावर प्रतिक्रिया देत, "तो खरोखरच अजून 15 वर्षांचा मुलगा आहे," असे म्हणत त्याचे कौतुक केले. काहींनी त्याच्या साधेपणाचे आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नाचेही समर्थन केले आहे.

आयपीएल 2026 मध्ये वैभवचा धडाकेबाज खेळ (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

आयपीएलच्या 19 व्या हंगामात वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. वैभवने 16 सामन्यांतील 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने तब्बल 776 धावा केल्या. या शानदार कामगिरीदरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतके झळकली. स्पर्धेतील त्याची सर्वोच्च खेळी 103 धावांची होती. सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

आयपीएल कारकिर्दीत 1000 धावांचा टप्पा पार (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये मोठा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 23 सामने खेळले असून 23 डावांत 44.7 च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 228.96 इतका प्रभावी आहे. वैभवच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शतके आणि सहा अर्धशतके नोंदवली गेली आहेत. याशिवाय त्याने 96 षटकार आणि 81 चौकार ठोकत आपल्या आक्रमक शैलीची झलक दाखवली आहे.

सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत (Vaibhav Sooryavanshi IPL 2026)

मैदानावरील तुफानी फलंदाजीमुळे आधीच चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी आता एअरपोर्टवरील व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. चेहरा टॉवेलने झाकण्याचा त्याचा प्रयत्न पाहून चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या असून, स्टार झाला तरी अजूनही निरागसच आहे, अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. 

हे ही वाचा -

Tim David News : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वात मोठा ट्विस्ट! टिम डेव्हिडवर BCCIने घातली बंदी, नेमकं काय घडलं? पाहा Video