Puducherry Cricket Scam News : जसा जागतिक क्रिकेटचा कारभार आयसीसी पाहते, तसाच भारतीय क्रिकेटचा पाया बीसीसीआय सांभाळते. खेळाडूंच्या मधील गुणवत्तेला बघणे, त्यांना स्पर्धात्मक बनवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तयार करणे. हे सगळं बीसीसीआयच्या मजबूत व्यवस्थेमुळे शक्य होतं. त्यासाठी त्यांच्याकडे उत्तम सपोर्ट स्टाफ आणि तज्ज्ञांची टीम आहे. बीसीसीआय खेळाडूंना असा मंच देते, जिथे ते स्वतःला सिद्ध करू शकतात. मात्र  पुडुचेरीमध्ये वेगळंच चित्र समोर आलं आहे. इथे बीसीसीआयच्या नाकाखाली जे सुरू आहे, ते चकित करणारं आणि धक्कादायक आहे.

Continues below advertisement

बीसीसीआयच्या नाकाखाली पुडुचेरीमध्ये फसवणूक

पुडुचेरीमध्ये संघात प्रवेश मिळवण्यासाठी सरळ शॉर्टकटचा वापर केला जातो. आणि हे करणारे लोक बीसीसीआय आणि सीएपी (क्रिकेट असोसिएशन पुडुचेरी) यांच्यापेक्षाही वेगळी समांतर प्रणाली चालवत आहेत. त्यांच्यासाठी सगळा खेळ पैशांचा आहे. मोठ्या रकमेत बनावट घराचे पत्ते तयार केले जातात, खोटे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिले जाते. आणि हे सर्व बीसीसीआयला न कळता सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसच्या चौकशीत हा संपूर्ण घोटाळा उघड झाला आहे.

Continues below advertisement

तपासात मोठा खुलासा...

इंडियन एक्सप्रेसने मागील 3 महिन्यांत पुदुचेरीतील 2000 हून अधिक खेळाडूंच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची तपासणी केली. अनेक माजी व सध्याचे खेळाडू, अधिकारी आणि प्रशिक्षकांशी संवाद साधला. याव्यतिरिक्त, दिलेल्या राहत्या पत्त्यांची आणि शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष चौकशीही करण्यात आली.

1.2 लाख रुपयांत तयार होता लोकल प्लेयर

अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपासणी केल्यानंतर, खाजगी क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकांकडून चालवली जाणारी एक सुव्यवस्थित बेकायदेशीर व्यवस्था उघडकीस आली. ते बनावट कागदपत्रे पुरवतात. त्यांचे ध्येय इतर राज्यातील क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या अनिवार्य एक वर्षाच्या निवासस्थानाच्या आवश्यकता पूर्ण करून स्थानिक खेळाडू म्हणून दाखवणे आहे. हे 1.2 लाख किंवा त्याहून अधिकच्या पॅकेजच्या बदल्यात केले जाते. पुडुचेरी क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील स्थान मिळवण्याचा हा एक मार्ग आहे.

एकाच पत्त्यावर 17 खेळाडू!

या फसवणूकीचं सर्वात मोठं उदाहरण वेगवेगळ्या संघांतून खेळणारे 17 “स्थानिक” खेळाडू एकाच आधार कार्डावरील पत्ता वापरत होते. जेव्हा त्या घरमालकाची विचारपूस झाली, तेव्हा कळलं की भाडे न दिल्याने ते महिन्यांपूर्वीच घराबाहेर काढले होते. ही व्यवस्था पुदुचेरीतल्या खऱ्या, जन्माने स्थानिक खेळाडूंची संधी हिसकावून घेत आहे.

स्थानिकांना संधीच नाही....

गेल्या चार वर्षांत पुदुचेरीने 29 रणजी सामने खेळले. पण त्यात फक्त 4 खेळाडू हे पुदुचेरीत जन्मलेले होते. या हंगामाच्या वीनू मांकड ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात तर 11 पैकी 9 खेळाडू बाहेरील राज्यांचे होते, त्यांना स्थानिक खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आलं.

हे ही वाचा -

Shubman Gill : उपकर्णधार असला तरी स्वतःला सिद्ध करावेच लागणार...; द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्याआधी शुभमन गिलला मिळाली वॉर्निंग