U19 Asia Cup Final: अंडर-19 आशिया चषकात भारतीय संघानं (India U19 Vs Bangladesh U19) चमदार कामगिरी करून दाखवलीय. अंडर-19 आशिया चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं बांगलादेशसमोर 244 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशला केवळ 140 धावापर्यंत मजल मारता आली. ज्यामुळं भारतानं बांगलादेशचा 103 धावांनी पराभव केलाय. अंतिम फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.


या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 38.2 षटकांत 140 धावा करून सर्वबाद झाला. या विजयासह भारत आठव्यांदा अंडर-19 आशिया कपच्या अंतिम फेरी पोहचणार संघ ठरलाय. 


या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 44.5 षटकांत 147 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 49.3 षटकांत केवळ 125 धावापर्यंत मजल मारू शकला. ज्यामुळं श्रीलंकेच्या संघानं 22 धावांनी हा सामना जिंकलाय. श्रीलंका आणि भारत यांच्यातील अंतिम सामना उद्या म्हणजेच 31 डिसेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.


बांगलादेशविरुद्ध सामन्यात भारताकडून शेख रशीदनं नाबाद 91 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्यानं आपल्या डावात 108 चेंडूंचा सामना केला. यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. याशिवाय विकी ओस्तवालनं 18 चेंडूत 28 धावांची नाबाद खेळी केली. त्यात तीन चौकारांचा समावेश आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha