Who Can Replace Tilak Varma In Team Indiaनवी दिल्ली: टी 20 वर्ल्ड कप सुरु होण्यास एका महिन्यांपेक्षा कमी कालावधी बाकी असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताला आशिया कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तिलक वर्मावर सर्जरी करण्यात आली. त्यामुळं तिलक वर्मा न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्यात तीन सामन्यांना मुकला आहे.यामुळंसूर्यकुमारयादवच्याटीम इंडियासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र, तिलक वर्मा दुखापतीमुळं टी 20 वर्ल्ड कपपूर्वीफिट नाही झाला तर त्याच्या जागी कोण अशा चर्चा सुरु आहेत. टीम इंडियाला तिलक वर्माच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करायची वेळ आल्यास पाच खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे.

तिलक वर्माच्या जागी कोणत्या 5 खेळाडूंच्या नावाची चर्चा?

1. श्रेयसअय्यर (Shreyas Iyer)

भारताच्या वनडेटीमचाउपकॅप्टनश्रेयसअय्यर हा अनुभवी खेळाडू आहे. श्रेयसअय्यरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा अनुभव आहे. श्रेयसअय्यरनं टी 20 क्रिकेटमध्येटीम इंडियासाठी मधल्या फलंदाजी केली आहे. आयपीएल2025 मध्ये 170 हून अधिक स्ट्राईकरेटनं धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जच्याटीमनंफायनलमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळंश्रेयसअय्यरकडे फलंदाजी आणि नेतृत्त्वाचा गुण आहे.

2. देवदत्तपडिक्कल (DevduttPadikkal)

विजय हजारेट्रॉफी 2025-26 मध्ये देवदत्तपडिक्कलनं दमदार कामगिरी केली आहे. या हंगामात त्यानं7 मॅचमध्ये91.42 च्या सरासरीनं640 धावा केल्या आहेत. त्यात 4 शतक आणि 1 अर्धशतक याचा समावेश आहे. देवदत्तपडिक्कलटॉपऑर्डरचा फलंदाज आहे. त्याचा सध्याचा फॉर्मदुर्लक्षित करणं अवघड आहे.

3. ईशानकिशन (Ishan Kishan)

ईशानकिशनदेखील स्फोटक फलंदाज आहे. तो मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ईशानकिशनफिरकीपटूंविरोधात आक्रमक फलंदाजी करु शकतो. ईशानकिशनची15 सदस्यांच्या संघात निवड झालेली आहे. त्यानं झारखंडला सय्यदमुश्ताक अली ट्रॉफीत विजेतेपद मिळवून दिल्यानंतर टीम इंडियात त्याची निवड झालीय. तिलक वर्मा फिट न झाल्यास प्लेईंगइलेव्हनमध्येईशानकिशनला संधी मिळू शकते.

4. नीतीश कुमार रेड्डी (Nitesh Kumar Reddy)

नीतीश कुमार रेड्डीला संधी मिळाल्यास भारताच्या फलंदाजीमधील खोली वाढू शकते याशिवाय तो गोलंदाजी करु शकतो. नितीश कुमार रेड्डी मधल्या फळीत वेगवान धावा करु शकतो. नितीश कुमार रेड्डीआयपीएलमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करतो. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना त्यानं खूप धावा केल्या आहेत.

5. ध्रुव जुरेल (Dhruv Jurel)

भारताच्या कसोटी संघातील विकेटकीपर ध्रुव जुरेल याचं नाव देखील चर्चेत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्यानं शतक लगावलं होतं. तो वनडे आणि टी 20 मध्ये देखील दमदार फलंदाजी करु शकतो. ध्रुव जुरेल विजय हजारेट्रॉफीत शानदार फॉर्ममध्ये आहे.