T20 World Cup 2026 Semi-Final Predictions : झिम्बाब्वे सेमीफायनलमध्ये, पाकिस्तान अन् दक्षिण आफ्रिका OUT, टीम इंडिया...? दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
T20 World Cup 2026 Semi-Final Predictions : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांची नावे आणि त्यांच्या लढती निश्चित झाल्या आहेत.

T20 World Cup 2026 Semi-Final Predictions : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांची नावे आणि त्यांच्या लढती निश्चित झाल्या आहेत. कोणता संघ कोणाविरुद्ध आणि कधी मैदानात उतरणार, याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे गट 1 मध्ये आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड गट 2 मध्ये आहेत. या दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
Presenting the Super 8️⃣ at the #T20WorldCup 2026 👊
— ICC (@ICC) February 18, 2026
More on the qualifications ➡️ https://t.co/lRFALG1p5d pic.twitter.com/bMUwhUps7f
सुपर-8 फेरीतील सामने 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. दरम्यान, सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ पोहोचतील याबाबत क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.
भारत आणि झिम्बाब्वे सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार...
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मोंटी पनेसर यांनीही मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, गट-1 मधून भारत आणि झिम्बाब्वे हे दोन संघ सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. झिम्बाब्वे संघाचे उंच वेगवान गोलंदाज त्यांच्या घातक गोलंदाजीने कोणत्याही संघाचे नुकसान करू शकतात आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित करू शकतात. पनेसर यांच्या या विधानाचा अर्थ असा की त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारख्या दिग्गज संघांना दुय्यम स्थान दिले आहे.
गट-2 मधून श्रीलंका आणि इंग्लंड दावेदार, पाकिस्तान बाहेर...
गट-2 बद्दल बोलताना पनेसर यांनी श्रीलंका आणि इंग्लंड यांना सेमीफायनलचे प्रबळ दावेदार ठरवले आहे. श्रीलंका ही यजमान असल्याने त्यांना घरच्या परिस्थितीचा फायदा मिळू शकतो, तर इंग्लंडकडे दमदार फलंदाजीची ताकद आहे, जी त्यांना अव्वल दोनमध्ये स्थान मिळवून देऊ शकते, असे त्यांचे मत आहे. यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या चाहत्यांमध्ये मात्र निराशेची भावना पसरली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पनेसर म्हणाले, “इंग्लंडकडे ताकदवान फलंदाजी आहे, त्यामुळे त्यांची शक्यता जास्त आहे. श्रीलंका यजमान आहे आणि योग्य वेळी फॉर्ममध्ये येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी केलेला धावांचा पाठलाग अप्रतिम होता. भारत तर प्रबळ दावेदार आहेच. चौथा संघ मला झिम्बाब्वे वाटतो, कारण त्यांच्याकडे अशी गोलंदाजी आहे जी त्यांना सेमीफायनलमध्ये नेऊ शकते.” (T20 World Cup 2026 Semi-Final Predictions)
हे ही वाचा -





















