एक्स्प्लोर

2027 ODI World Cup India : वर्ल्ड कप 2027साठी भारताचा अर्धा संघ ठरला?, 6 नावं समोर, एका मोठ्या नावाला धक्का! कुणी केली ही निवड?

ODI World Cup 2027 Team India Update : 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

ODI World Cup 2027 Team India Update : 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी विश्वचषकासाठी भारताच्या संभाव्य संघातील पहिल्या सहा फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या यादीत ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही. यष्टीरक्षणासाठी केएल राहुल, तर राखीव पर्याय म्हणून इशान किशनला पसंती दिली जाऊ शकते, असे चोप्रांचे मत आहे. आकाश चोप्रांच्या मते, भारताची आघाडीची फळी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्याभोवती असेल. या तिघांकडे अनुभवासोबतच मोठ्या सामन्यांमध्ये कामगिरी करण्याची क्षमता आहे.

टॉप ऑर्डरमध्ये रोहित, गिल आणि विराट

आकाश चोप्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, 2023 आणि 2027च्या विश्वचषकातील भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये फारसा बदल दिसत नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. सध्या तिन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. विशेष म्हणजे, 2026 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित, विराट आणि गिल यांचा समावेश आहे. शुभमन गिल सध्या या यादीत आघाडीवर आहे.

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर

आकाश चोप्रांनी चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरची निवड केली आहे. व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये अय्यर हा जगातील सर्वोत्तम मधल्या फळीतील फलंदाजांपैकी एक असल्याचे चोप्रांचे मत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरने 47 पेक्षा जास्त सरासरीने 2 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे विश्वचषकात चौथ्या क्रमांकाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली जाऊ शकते.

केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी

पाचव्या क्रमांकासाठी केएल राहुलचे नाव आकाश चोप्रांनी निश्चित केले आहे. राहुल हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षकही असू शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी तब्बल 68.58 आहे. या स्थानावर त्याने चार शतके आणि दहा अर्धशतके झळकावली आहेत.

हार्दिक पांड्यावरही चोप्रांचा विश्वास

सहाव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्याला पसंती देण्यात आली आहे. सध्या हार्दिक दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे आणि आयपीएल 2026 नंतर त्याने कोणताही सामना खेळलेला नाही. आगामी न्यूझीलंड मालिकेतही त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, आकाश चोप्रांना हार्दिकच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मते, हार्दिकला त्यांनी कधीही खराब फॉर्ममध्ये पाहिलेले नाही. त्यामुळे तो फिट असल्यास 2027 विश्वचषकात सहाव्या क्रमांकासाठी भारताचा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

आकाश चोप्रांच्या संभाव्य टॉप-6ची यादी

1. रोहित शर्मा
2. शुभमन गिल
3. विराट कोहली
4. श्रेयस अय्यर
5. केएल राहुल
6. हार्दिक पांड्या

हे ही वाचा -

IND vs WI 1st T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी OUT, संजू-अभिषेक सलामीला; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारतीय खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा! न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास, नावार केले चार मोठे विक्रम
ICC : 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2031 ला वनडे वर्ल्ड कपचं आयोजकपद भारताकडे, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, ICC कडून 2035 पर्यंतचं वेळापत्रक जारी
2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी तर 2031 ला वनडे वर्ल्ड कपचं आयोजकपद भारताकडे, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी
Team India : गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताचा विदेशातील पहिला वनडे मालिका विजय, अय्यरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडन संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
Maharashtra Farmers Farmer ID : शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेतकऱ्यांनो तातडीने 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा शासकीय योजनांचे पैसे अडकणार; मदत व पुनर्वसन विभागाचे महत्त्वाचे आवाहन
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
शेगावहून दर्शन घेऊन परतताना हायवेवर भीषण अपघात; दुचाकीवरील तीन तरुण ठार, परिसरात हळहळ
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
लातूर जिल्हा बँक निवडणुकीत 99.40 टक्के मतदान; उद्या मतमोजणी, देशमुख-निलंगेकरांची प्रतिष्ठा पणाला
Embed widget