एक्स्प्लोर

Team India Hong Kong Sixes : भुरट्या संघांकडून टीम इंडियाचे सलग तीन पराभव, नेपाळ, कुवेत आणि यूएईने एकाच दिवसात हरवलं

Team India Lose to UAE, Nepal After Kuwait : गट टप्प्यातील पूल-सीमध्ये कुवेतकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडूनही पराभव पत्करावा लागला.

Team India Third Consecutive Defeat Hong Kong Sixes : हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत आज भारताला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. गट टप्प्यातील पूल-सीमध्ये कुवेतकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडूनही पराभव पत्करावा लागला. कुवेतविरुद्धच्या पराभवानंतरच भारत क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला होता. आता बाउल राउंडमधील पराभवांमुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

यापूर्वी भारताने गट टप्प्यातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा डकवर्थ-लुईस नियमांतर्गत दोन धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सलग पराभवांमुळे भारत पूल-सीमध्ये कुवेत आणि पाकिस्तानच्या मागे तिसऱ्या स्थानावर राहिला. बाउल राउंडमध्ये यूएई आणि नेपाळकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ सध्या चौथ्या स्थानी आहे. आता संघाचा पुढील सामना 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

लिंबूटिंबू कुवेत संघाने टीम इंडियाला हरवलं (Kuwait beat India Hong Kong Sixes 2025)

पूल-सीमधील सामन्यात कुवेतने भारतावर 27 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही निराशाजनक ठरल्या. कुवेतने प्रथम फलंदाजी करत केवळ सहा षटकांत पाच गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताची संघ 5.4 षटकांत सहा गडी गमावून फक्त 79 धावांपर्यंतच मजल मारू शकली.

कुवेतनंतर यूएईसारख्या लहान संघानेही टीम इंडियाला हरवलं (UAE beat India Hong Kong Sixes 2025)

बाउल राउंडमधील पहिल्या सामन्यात भारताने यूएईविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि सहा षटकांत तीन गडी गमावून 107 धावा केल्या. अभिमन्यु मिथुनने जबरदस्त खेळी करत 16 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. कर्णधार दिनेश कार्तिकनेही आक्रमक खेळ दाखवत 14 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. 

108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार खालिद शाहने फक्त 14 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांसह 50 धावा केल्या. तर निलांश केसवानीने नाबाद पाच धावा करत यूएईला विजय मिळवून दिला. भारताकडून बिन्नी आणि चिपळी यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

नेपाळसमोर 3 ओव्हर पण टिकू शकला नाही टीम इंडिया (Nepal beat India Hong Kong Sixes 2025)

बाउल राउंडमधील दुसऱ्या सामन्यात भारताला नेपाळकडून तब्बल 92 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने केवळ सहा षटकांत एकही गडी न गमावता 137 धावांचा डोंगर उभा केला.  138 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ तीन षटकांतच 45 धावांवर गारद झाला, म्हणजेच सर्व सहा गडी बाद झाले. 

या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले असून, प्रत्येकी तीन संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातील तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना बाउल ग्रुपमध्ये ठेवण्यात आले, तर अव्वल दोन संघांनी क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश केला. क्वार्टर फायनलनंतर स्पर्धा नॉकआउट टप्प्यात जाते, ज्यात मुख्य फायनल, प्लेट फायनल आणि बाउल फायनल अशा विविध स्तरांवर सामने खेळवले जातात, जेणेकरून सर्व संघांना स्पर्धात्मक संधी मिळेल.

स्पर्धेचा फॉर्मेट

प्रत्येक संघात 6 खेळाडू असतील आणि प्रत्येक संघाला 6 षटके फलंदाजीसाठी मिळतील. म्हणजेच एकूण सामना 12 षटकांचा असेल. 5 खेळाडू गोलंदाजी करू शकतात, परंतु यष्टिरक्षकाला गोलंदाजीची परवानगी नाही. त्यापैकी 4 खेळाडू प्रत्येकी 1 ओव्हर टाकतील आणि 1 खेळाडू 2 ओव्हर टाकेल (पण सलग नाही). जर एखादा फलंदाज 50 धावा पूर्ण करेल, तर त्याला ‘नॉट आऊट’ अवस्थेत रिटायर व्हावे लागेल. तो पुन्हा फक्त तेव्हाच फलंदाजीस येऊ शकतो, जेव्हा इतर फलंदाज बाद होतील.

हे ही वाचा -

ऋषभ पंतला पुन्हा दुखापत, वेदनेने विव्हळत मैदान सोडलं; नेमकं काय घडलं?, पाहा धडकी भरवणारा VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धुरंदरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंदरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धुरंदरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंदरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
Jay Pawar Rutuja Patil Marriage : फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
फुलांची उधळण अन् शाही सोहळा; जय पवार- ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचे न पाहिलेले फोटो समोर, नवविवाहीतांनी पोस्ट केली शेअर
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? मोठा भाऊ कोण अन् कोणाच्या वाट्याला किती जागा??
Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी
Pune Leopard: वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
वनखात्याने बिबट्याला पकडायला सापळा लावला, पण चलाख बिबट्याने बाहेरुनच कोंबडीचं मुंडकं पकडलं
Embed widget