IND Squad vs WI Test Series : ऋषभ पंत बाहेर, KL राहुल उपकर्णधार; श्रेयस अय्यरची एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी 'या' 15 शिलेदारांनी मिळणार संधी?
India vs West Indies Test Series 2025 : बीसीसीआय पुढील आठवड्यात वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ जाहीर करणार आहे. ऋषभ पंत या मालिकेला मुकणार आहे.

Team India Squad For West Indies Test Series 2025 : आशिया कप 2025चा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार असून, केवळ चार दिवसांच्या अल्प विश्रांतीनंतर टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. 2 ऑक्टोबरपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील कसोटी मालिका सुरू होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती 23 किंवा 24 सप्टेंबर रोजी अधिकृत संघाची घोषणा करणार आहे. त्याआधीच भारताचा संभाव्य कसोटी संघ समोर आला आहे.
🚨 TEAM INDIA'S SQUAD FOR THE TEST SERIES Vs WEST INDIES LIKELY TO BE PICKED ON SEPTEMBER 23 OR 24TH 🚨 (Sportstar). pic.twitter.com/vXNcq7I2XA
— Tanuj (@ImTanujSingh) September 21, 2025
यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल सलामीवीर...
यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल यांची जोडी सलामीला येणार आहे. कारण इंग्लंड दौऱ्यात दोघांनीही दमदार कामगिरी केली होती. तर ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर जाईल, तर राहुलला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
करुण नायर पुन्हा मिळणार संधी, तर अय्यरची होणार एन्ट्री?
तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन आणि त्यानंतर टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल फलंदाजीला येतील. करुण नायरला या वेळेस पुन्हा संधी न मिळण्याची चिन्हे आहेत. तर भारत ‘ए’ संघाचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर कसोटीत पुनरागमन करण्यास सज्ज आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर तो संघाबाहेर होता.
ऋषभ पंत बाहेर, ध्रुव जुरेल असणार यष्टीरक्षक
दुखापतीमुळे ऋषभ पंत या मालिकेला मुकणार आहे, त्यामुळे ध्रुव जुरेल पहिला पर्याय असणार आहे. तर नारायण जगदीसनलाही संघात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. इशान किशनला यावेळी स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
🚨 INDIAN TEST TEAM UPDATE 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2025
- The Indian team for the West Indies Test series is likely to be picked on September 23 or 24. [RevSportz] pic.twitter.com/cp9TUi1o2W
4 फिरकीत, तर 3 वेगवान गोलंदाजांना मिळणार संधी?
रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे आपले स्थान कायम ठेवणार आहेत. अक्षर पटेलला देखील कसोटीत पुनरागमनाची मोठी संधी आहे. फिरकीत कुलदीप यादव निश्चित असून अक्षर पटेल त्याला साथ देऊ शकतो. वेगवान गोलंदाजांच नेतृत्व मोहम्मद सिराज करू शकतो, कारण जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि आकाश दीप यांना संधी मिळेल.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा संभाव्य कसोटी संघ (India's likely squad for Test series vs West Indies) -
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नारायण जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अक्षर पटेल.
हे ही वाचा -





















