Team India Schedule Super-8 T20 World Cup 2026 : 3 सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार?, A टू Z माहिती
Team India Schedule Super 8 T20 World Cup 2026 Update : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत टीम इंडियाचा विजयाचा रथ वेगाने धावत आहे. पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत भारताने सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे.

Team India Schedule For Super 8 T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत टीम इंडियाचा विजयाचा रथ वेगाने धावत आहे. पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत भारताने सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. अजून एक लीग सामना बाकी असला तरी भारतीय संघाने पुढील टप्प्यासाठी तिकीट जवळपास पक्कं केलं आहे. आता चाहत्यांची नजर सुपर-8 मधील थरारक लढतींकडे लागली आहे.
सुपर-8 मध्ये भारताचं वेळापत्रक (Who will India play in T20 World Cup Super 8)
22 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी सुपर-8 सामने खेळाले जाणार आहेत, भारताला सुपर-8 फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत. तारीख आणि संभाव्य प्रतिस्पर्धी खालीलप्रमाणे...
- 22 फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- 26 फेब्रुवारी – भारत विरुद्ध झिम्बाब्वे किंवा ऑस्ट्रेलिया
- 1 मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला उपांत्य फेरीसाठी स्थान निश्चित करण्याची मोठी संधी असेल. प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे.
18 फेब्रुवारीला शेवटचा लीग सामना
सुपर-8 पूर्वी भारताला अजून एक लीग सामना खेळायचा आहे. हा सामना 18 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ आत्मविश्वासाने सुपर-8 फेरीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
टीम इंडियाचा विजयरथ कायम
आतापर्यंतचे तीनही लीग सामने जिंकत भारताने स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत संघ संतुलित आणि आक्रमक दिसत आहे. 22 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुपर-8 फेरीत भारताचा खरा कस लागणार आहे. आता चाहत्यांनी तारखा नोंदवून ठेवा, कारण पुढील काही दिवस क्रिकेटप्रेमींसाठी जबरदस्त थरार घेऊन येणार आहेत.
पाकिस्तानवर बाहेर पडण्याचा धोका
भारताविरुद्ध या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाचा सर्वाधिक फटका त्यांच्या नेट रनरेटला बसला आहे. भारताने विजयासह सुपर-8 मधील स्थान निश्चित केले, तर पाकिस्तान गट-अ मध्ये थेट तिसऱ्या स्थानावर घसरला. दुसऱ्या स्थानावर असलेल्या यूएसएचे गुण समान असले तरी त्यांचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. आता नामिबियाविरुद्धचा पुढील सामना पाकिस्तानसाठी करो किंवा मरो ठरणार आहे. त्या सामन्यात पराभव झाल्यास त्यांचा प्रवास गट टप्प्यातच संपुष्टात येऊ शकतो.
हे ही वाचा -





















