IND vs SL, World Cup 2023: विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतीय संघाने रविवारी इंग्लंडचा पराभव केला. आता भारताचा पुढील सामना श्रीलंकासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने येतील. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी नाणेफेक होईल.


लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित केलेय. गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाने पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यांना फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचाच आहे. यंदाच्या विश्वचषकात अजय असणारा टीम इंडिया एकमेव संघ आहे. 


वानखेडेचा रेकॉर्ड काय ?


मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषकातील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी कताना 380 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याचे आकडेवारी सांगते. वानखेडेचे मैदान हायस्कोरिंग आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतो. 


हेड टू हेड आकडे काय सांगतात ?


भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.  


मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता. 


लाईव्ह कुठे पाहाल ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना  टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. मोबईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.