Team India In World Cup 2023 : साखळी सामन्यात भारतीय संघाने निर्वादित वर्चस्व गाजवले. भारताने आपल्या नऊ सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलेय. यंदाच्या विश्वचषकात साखळी सामन्यात अजिंक्य राहणारा भारतीय संघ एकमेव आहे. भारताच्या गोलंदाजीसमोर एकाही संघाला 300 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत लौकिकास साजेशी कामगिरी केली आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारताने शानदार कामगिरी केली. पाहूयात भारताचा विश्वचषकातील प्रवास कसा राहिलाय..

  


8 ऑक्टोबर -


ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव करत भारताने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 199 धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान चार विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी केली होती. 


11 ऑक्टोबर - 


दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा आठ विकेटने पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी कताना 272 धावा केल्या. भारताने हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 


14 ऑक्टोबर -


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पारभव केला. पाकिस्ताने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांपर्यंत मजल मारली. भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 


19 ऑक्टोबर - 


पुण्यात भारताने बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 265 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 


22 ऑक्टोबर - 


धरमशालाच्या मैदानात भारताने बलाढ्य न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करातना 273 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान सहा विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 


29 ऑक्टोबर - 


गतविजेत्या इंग्लंडला भारताने 100 धावांनी हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 229 धावांपर्यंत मजल मारली. भारताने गोलंदाजीत कमाल दाखवली. इंग्लंडला फक्त 129 धावांत बाद करत सहज विजय मिळवला. 


2 नोव्हेंबर - 


वानखेडे मैदानावर भारताने श्रीलंकेचा पालापाचोळा केला. भारताने लंकेला 302 धावांनी पराभव केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर लंकेला फक्त 55 धावांत गुंडाळले. 


05 नोव्हेंबर - 


बलाढ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने 243 धावांनी हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने वनडेमधील 49 वे अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरदाखल आफ्रिकेचा संघ फक्त 83 धावांपर्यंत मजल मारु शकला. 


12 नोव्हेंबर - 


भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्सचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला.