Team India T20 World Cup 2026 : 4 सामन्यांत 4 विजय, तरीही ड्रेसिंग रूममध्ये तणाव; धक्कादायक रेकॉर्ड समोर, गंभीर अन् सूर्याचा डोक्याला हात
Team India Dropped 9 Catches T20 World Cup 2026 : क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे... कॅच पकडा, मॅच जिंका! पण हीच गोष्ट आता सुपर-8 आधी टीम इंडियाला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागणार आहे.

Team India dropped nine catches T20 World Cup 2026 : क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे... कॅच पकडा, मॅच जिंका! पण हीच गोष्ट आता सुपर-8 आधी टीम इंडियाला पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागणार आहे. टी-20 वर्ल्डकप ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वात मोठा दावेदार मानला जाणारा सूर्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फलंदाजीत आक्रमक आणि गोलंदाजीत धारदार दिसतोय, पण फील्डिंगचा विभाग मात्र चिंतेची घंटा वाजवतोय.
सुपर-8 आधी भारतीय संघाने 9 कॅच सोडले आहेत. कोणत्याही टॉप टीमसाठी ही धोक्याची घंटा आहे, विशेषतः जेव्हा पुढे नॉकआउटसारखा टप्पा असतो. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात तब्बल 4 कॅच सुटल्याने ही कमजोरी अधिकच उघडी पडली. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनीही ही बाब मान्य करत सांगितले की, संघ या बाबतीत सातत्याने मेहनत घेत आहे, मात्र खेळाडूंवर अनावश्यक दबाव टाकायचा नाही. टी-20 क्रिकेटमध्ये एक कॅच सामन्याचा संपूर्ण कल बदलू शकतो. आणि सुपर-8 सारख्या हाय-प्रेशर टप्प्यात तर एका चुकीची किंमत खूप महाग ठरू शकते.
भारताने आतापर्यंत 20 कॅच घेतले, पण....
विश्वचषकात भारतीय क्षेत्ररक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, भारताने आतापर्यंत 20 कॅच घेतले आहेत, परंतु त्यांची कॅच पकडण्याची कार्यक्षमता फक्त 68.97% आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गोलंदाज क्षेत्ररक्षणाच्या चुकांमुळे दर दहापैकी तीन संधी गमावत आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेबाहेर गेलेल्या आयर्लंडने सर्वाधिक 10 कॅच सोडले, पण भारत त्याच्या लगेच मागे आहे, ही बाब नक्कीच चिंताजनक आहे.
तिलक वर्माने सोडले सर्वाधिक कॅच...
नेदरलँड, पाकिस्तान आणि युनायटेड स्टेट्स विरुद्ध तिलक वर्माने सर्वाधिक 3 कॅच सोडले. याशिवाय कुलदीप यादव, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनीही महत्त्वाच्या क्षणी चुका केल्या. म्हणजेच समस्या एखाद्या एका खेळाडूपुरती मर्यादित नाही.
दोन दिवसांत शोधायचा उपाय
दिलासादायक बाब म्हणजे टीम मॅनेजमेंट परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून आहे. सराव सत्रांमध्ये हाय-कॅच आणि प्रेशर फील्डिंग ड्रिल्सवर विशेष भर दिला जातोय. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर भारत अजूनही स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. पण सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सारख्या तगड्या आणि उत्कृष्ट फील्डिंग करणाऱ्या संघांविरुद्ध ही कमजोरी महागात पडू शकते.
हे ही वाचा -





















