एक्स्प्लोर

Team India Champions T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक! नरेंद्र मोदी स्टेडियमची माती कपाळावर लावून केला सलाम, Video

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला.

विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक!

या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयाचा आनंद साजरा करताना सूर्यानं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानाची माती उचलून ती कपाळावर लावली आणि मैदानाला सलाम केला. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही संघाला आपले विजेतेपद राखता आले नव्हते. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाने हा विक्रम मोडला. भारत आता सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.

टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश

या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते आणि घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाला टी-20 विश्वचषक जिंकता आला नव्हता. मात्र, न्यूझीलंडचा पराभव करत भारताने हा अडथळाही दूर केला आणि यजमान देश म्हणून टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.

टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडवर पहिलाच विजय

टी-20 विश्वचषकात भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय मिळवता आला नव्हता. 2007, 2016 आणि 2021 या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत हा किवी जादू अखेर मोडून काढला. दोन्ही संघांमधील टी-20 विश्वचषकातील हा चौथा सामना होता आणि यात भारताने पहिल्यांदाच बाजी मारली.

हे ही वाचा - 

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi MI vs RR IPL 2026: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार ठोकले, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
बुमराहच्या गोलंदाजीवर 2 गगनचुंबी षटकार, मुंबईला लोळवलं; आता वैभव सूर्यवंशीची 4 शब्दांची पोस्ट!
Arshdeep Singh Dating Punjabi Actress Samreen Kaur: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
टीम इंडियाच्या स्टार गोलंदाज 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा? हातात हात धरल्याचा फोटो Viral
RR vs MI IPL 2026 : गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
गुवाहाटीत राजस्थानचा मुंबईवर 'रॉयल' विजय; पांड्या आला तरी 'पटलन'ची गाडी पलटी, सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत रियान परागचा 'हल्ला बोल'
RR vs MI Update IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
RR vs MI IPL 2026 : पावसानंतर जैस्वाल-सूर्यवंशीचे वादळ; मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget