Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून एकूण तिसऱ्यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत असा पराक्रम करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

Continues below advertisement

Continues below advertisement

टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड' (Team India Champions T20 World Cup 2026 All Record)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 56 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. यासह पुन्हा एकदा क्रिकेटविश्वावर आपला दबदबा सिद्ध केला. भारताने यापूर्वी 2007 साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा हा किताब पटकावला. आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकत इतिहासात लिहिला.

टीम इंडियाने जिंकले 5 विश्वचषक 

या विजयासह भारताने क्रिकेटच्या इतिहासात आता एकूण पाच विश्वचषकांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे दोन (1983 आणि 2011) आणि टी-20 विश्वचषकाचे तीन (2007, 2024, 2026) किताब समाविष्ट झाले आहेत.

सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम (Won the T20 World Cup twice in a row)

सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करत टीम इंडियाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा अधोरेखित केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांना हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला. या विजयाने भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर क्रिकेटविश्वात नवा विक्रमही प्रस्थापित केला. 

हे ही वाचा - 

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारत विश्वविजेता! टीम इंडिच्या वाघांची ऐतिहासिक गर्जना, न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा 'चॅम्पियन'