VIDEO : विजयी ट्रॉफी उचलताच टीम इंडियाचे भन्नाट सेलीब्रेशन, विराटने सगळी शॅम्पेन ऋषभ पंतच्या अंगावर उडवली
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि सलग दुसरे आयसीसी जेतेपद जिंकले.

Team India Celebration : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि सलग दुसरे आयसीसी जेतेपद जिंकले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी केली आणि टीम इंडियाला 252 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघाने संयमाने यावर मात केली आणि न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. अशाप्रकारे, 2013 नंतर भारताने या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली.
TEAM INDIA ARE CHAMPIONS AGAIN! 🏆🇮🇳#ChampionsTrophyOnJioStar #INDvNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/Uh6EZWFfSL
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
रोहित-कोहलीचा 'दांडिया डान्स' व्हायरल
विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एक खास डान्स केला. दोघांनीही विकेट हातात घेऊन दांडिया डान्स केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. त्यानंतर जेव्हा टीम इंडियाने विजयी ट्रॉफी उचलली, तेव्हा भन्नाट सेलीब्रेशन पाहायला मिळाले, विराट कोहलीने जवळपास सगळी शॅम्पेन ऋषभ पंतच्या अंगावर उडवली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
CHAMPIONS 🇮🇳🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/5fjltfyBB6
— BCCI (@BCCI) March 9, 2025
हिटमॅनची बॅट तळपली, विराट कोहली मात्र शांत
भारतीय कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही काळापासून मोठा फ्लॉप ठरत आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याची बॅट तळपली, सर्वांना अपेक्षा होती की रोहित शर्मा या सामन्यात शतक करेल, परंतु तो शतक करण्यापासून दूर राहिला, जरी रोहित शर्मा शतक करू शकला नाही तरी तो टीम इंडियाला विजयापर्यंत घेऊन गेला. अंतिम सामन्यात विराट कोहलीची बॅट शांत राहिली, तर विराट कोहली दोन चेंडूत एक धाव घेत बाद झाला. असे असूनही, टीम इंडियाने न्यूझीलंडकडून 25 वर्षांचा बदला घेतला.
टीम इंडियाने जिंकली सातवी आयसीसी ट्रॉफी!
टीम इंडियाची ही सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने 1983 आणि 2011 चा एकदिवसीय वर्ल्ड कप, 2007 आणि 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2002, 2013 आणि 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. त्याने सलग पाच सामने जिंकले आहे.
हे ही वाचा -





















