England vs India 1st Test Day 2 : इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 471 धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वाल (101), शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंत (134) यांनी शानदार शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टँग यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले, कारण टीम इंडियाने शेवटचे 7 बळी अवघ्या 41 धावांत गमावले.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 359/3 च्या धावसंख्येवरून खेळायला सुरूवात केला. ऋषभ पंतने दमदार शैलीत फलंदाजी करताना आपले शतक पूर्ण केले. त्याच वेळी शुभमन गिल 150 धावा काढण्यापासून हुकला, त्याला 147 धावांवर शोएब बशीरने आऊट केले. त्याच वेळी पंतने 134 धावांची खेळी खेळली. त्यानंतर, क्रिजवर आलेल्या 6 फलंदाजांपैकी फक्त एकच खेळाडू धावांच्या बाबतीत दुहेरी आकडा गाठू शकला.
41 धावांत पडल्या 7 विकेट्स
भारतीय संघाने एकेकाळी 3 बळी गमावून 430 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने उर्वरित 7 विकेट अवघ्या 41 धावांत गमावल्या. 8 वर्षांनी संघात परतलेला करुण नायर खातेही उघडू शकला नाही. शेवटच्या 6 फलंदाजांपैकी फक्त रवींद्र जडेजा 10 धावांचा टप्पा गाठू शकला. अष्टपैलू खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालेला शार्दुल ठाकूरही फक्त 1 धाव काढून बाद झाला. रवींद्र जडेजाने 11 धावा केल्या.
बेन स्टोक्स आणि जोश टंगने दुसऱ्या दिवशी केला कहर
दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, बेन स्टोक्स आणि जोश टंगने दुसऱ्या दिवशी टीम इंडियावर कहर केला. स्टोक्स आणि टंगने एकूण चार विकेट घेतल्या. त्याच वेळी, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यासोबतच, भारतीय संघाच्या नावावर एक वाईट विक्रमही जोडला गेला आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात कमी धावसंख्या आहे, जेव्हा एकाच डावात संघाच्या 3 फलंदाजांनी शतक केले आहे.
हे ही वाचा -