T20 World Cup Semi-final Scenario : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. इंग्लंडनंतर एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ग्रुप 2 मध्ये वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीत (Semi-final) धडक मारली आहे. आता उरलेल्या दोन जागांसाठी भारत, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या चार संघांमध्ये जोरदार शर्यत सुरू आहे. तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत.

Continues below advertisement

ग्रुप-1 : भारत आणि विंडिजमध्ये 'करो या मरो'ची लढत

टीम इंडियाने झिम्बाब्वेचा पराभव केल्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांत दोन विजयांसह 4 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आपले सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे. मात्र, याच ग्रुपमधून दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काट्याची टक्कर आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज 2 सामन्यांत 2-2 गुणांसह शर्यतीत कायम आहे. 1 मार्चला दोन्ही संघ भिडणार आहेत. जो कोणी सामना जिंकले, तो थेट सेमीफायलनसाठी पात्र होईल.

Continues below advertisement

ग्रुप-2 : इंग्लंड पात्र; न्यूझीलंड की पाकिस्तान?

ग्रुप-2 मध्ये इंग्लंडने 2 सामन्यांत 4 गुण मिळवून दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता या ग्रुपमधून दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पेच निर्माण झाला आहे. न्यूझीलंड सध्या 3 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे पारडे जड दिसत आहे. पाकिस्तान 2 सामन्यांत केवळ 1 गुण मिळवू शकलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानला जर सेमीफायनल गाठायची असेल, तर त्यांना आपला पुढचा सामना मोठ्या फरकाने जिंकून न्यूझीलंडच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे.

श्रीलंका आणि झिम्बाब्वे स्पर्धेबाहेर

खराब कामगिरी आणि सलग दोन पराभवांमुळे श्रीलंकेला अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही. -2.800 अशा खराब नेट रन रेटमुळे ते गुणतालिकेत तळाला फेकले गेले असून स्पर्धेतून बाहेर पडणारा (Eliminated) हा या ग्रुपमधील पहिला संघ ठरला आहे.

तर टीम इंडियाविरुद्ध पराभवानंतर झिम्बाब्वेचा प्रवासही या टप्प्यावर थांबला आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पराभव केला होता, पण त्यांना सुपर-8 मध्ये स्पर्धेतून निरोप घ्यावा लागला.

दक्षिण आफ्रिकेची सेमीफायनलमध्ये धडक

भारताकडून 76 धावांनी पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी सुपर-8 सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडीजने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये 177 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान अवघ्या 16.1 षटकांत एक विकेट गमावून सहज पार केले आणि आपली ताकद दाखवून दिली.

हे ही वाचा -

IND vs ZIM : टीम इंडियाने खातं उघडलं अन् गेम फिरवला! झिम्बाब्वे पराभूत, भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळणार?, 1 मार्चला ठरणार