T20 World Cup 2026 Wasim Akram Prediction: आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2026) 7 फेब्रुवारी 2026 पासून खेळवला जाणार आहे. भारत आणि श्रीलंका या टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणार आहे. टी-20 विश्वचषकाची स्पर्धा सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वसीम अक्रमने एक भविष्यवाणी केली आहे. 

Continues below advertisement

2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) सामना 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात सातत्याने सुधारणा झाली आहे, तर पाकिस्तानची कामगिरी घसरली आहे. याचकारणामुळे वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट संघाला आरसा दाखवला आहे. वसीम अक्रमने टी-20मधील टॉप चार संघामध्ये पाकिस्तानचा समावेश केला नाही. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहचतील अशी भविष्यवाणी वसीम अक्रमने केली आहे.

पाकिस्तानचा समावेश न करण्याचे मुख्य कारण- (T20 World Cup 2026 Wasim Akram Prediction)

आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानची अलिकडची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, म्हणूनच वसीम अक्रमने त्याच्याच देशाच्या संघाला टॉप चार फेव्हरिटमध्ये समाविष्ट केले नाही. 2024 च्या टी-20 विश्वचषकात, पाकिस्तान गट टप्प्यात बाहेर पडला होता, तर अमेरिका, भारतासह पुढील फेरीसाठी पात्र ठरली होती. पाकिस्तान संघ गेल्या काही काळापासून संघर्ष करताना दिसत आहे.

Continues below advertisement

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संपूर्ण संघ: (Team India Squad T20 World Cup 2026)

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.

2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक  (Team India’s Schedule for the T20 World Cup 2026)

7 फेब्रुवारी - विरुद्ध अमेरिका12 फेब्रुवारी - विरुद्ध नामिबिया15 फेब्रुवारी - विरुद्ध पाकिस्तान18 फेब्रुवारी - विरुद्ध नेदरलँड्स

संबंधित बातमी:

T20 World Cup 2026 Shubhman Gill: शुभमन गिलची फसवणूक झाली?; टी-20 विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Team India Squad T20 World Cup 2026: शुभमन गिलच नव्हे, जितेश शर्मालाही वगळलं, बीसीसीआयचे 5 धाडसी निर्णय, टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?