Team India Playing XI vs USA : अभिषेक–ईशान सलामीवीर, संजू-हर्षित OUT, अमेरिकेविरुद्ध पहिला वर्ल्डकप सामना, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Team India Playing XI vs USA Marathi News : टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळायचा आहे.

Team India Playing XI vs USA : टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळायचा आहे. सध्या तरी भारतीय संघाची तयारी सध्या तरी चांगली दिसत आहे. काही खेळाडू दुखापतीतून सावरत असले तरी सुरुवातीच्या सामन्यावर त्याचा फारसा परिणाम होईल, असे चित्र नाही. अशातच पहिल्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन नेमकी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः सलामी जोडी कोणती असेल, याबाबत उत्सुकता आहे.
टी-20 विश्वचषकातही भारताचा आक्रमक पवित्रा...
टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या टी-20 मालिकेत भारताने पाचपैकी चार सामने जिंकले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या वॉर्मअप सामन्यातही भारताने विजय मिळवला. या कामगिरीवरून असे स्पष्ट होते की, भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत आक्रमक शैलीत खेळण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यूएसएच्या गोलंदाजांसाठी हा सामना कठीण ठरण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदर पूर्ण तंदुरुस्त नाही, हर्षित राणाही बाहेर...
जर भारताच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनकडे पाहिले, तर बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघातील दोन खेळाडू पहिल्या सामन्याला मुकू शकतात. वॉशिंग्टन सुंदर अद्याप पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. तसेच हर्षित रणालाही पहिल्या सामन्यात संधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत. त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा विचार केला जात असला, तरी तो थेट पहिलाच सामना खेळेल का, यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
अभिषेक शर्मा–ईशान किशन सलामीवीर
शनिवारी यूएसएविरुद्ध भारत मैदानात उतरेल, तेव्हा अभिषेक शर्मा आणि ईशान किशन ही जोडी डावाची सुरुवात करण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात या जोडीने दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे संजू सॅमसनला सध्या बाहेर बसावे लागू शकते. मात्र अंतिम निर्णय टीम मॅनेजमेंटचा असेल. तिलक वर्माची तिसऱ्या क्रमांकावर पुनरागमन होण्याची शक्यता आहे, तर चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीस उतरेल. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर, त्यानंतर शिवम दुबे आणि अक्षर पटेल खेळताना दिसू शकतात. रिंकू सिंगकडे फिनिशरची जबाबदारी असेल.
बुमराह, अर्शदीप अन् वरुण खेळणार जवळपास निश्चित
गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या हेही आपल्या ओव्हर्स टाकतील. गरज भासल्यास शिवम दुबेकडूनही काही ओव्हर्स करून घेतले जाऊ शकतात. वॉर्मअप सामन्यात अभिषेक शर्मा ते रिंकू सिंगपर्यंत अनेक खेळाडूंनी गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यात तसे होण्याची शक्यता कमी आहे.
यूएसएविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-11 (Team India Playing XI vs USA) : अभिषेक शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
हे ही वाचा -





















