T20 World Cup 2026 Super 8 Schedule Update Marathi News : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ग्रुप फेरीत एकूण 40 सामने होणार होते. 35व्या सामन्यानंतरच सुपर-8 फेरीत पोहोचणाऱ्या सर्व 8 संघांचा निर्णय झाला. नामिबियावर दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानने सुपर-8 मध्ये प्रवेश करणारा आठवा आणि शेवटचा संघ ठरला. याआधी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांनी पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. सुपर-8 फेरीची सुरुवात 21 फेब्रुवारीपासून होणार आहे.

Continues below advertisement

सुपर-8 मध्ये दोन गट

सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ संघांना प्रत्येकी चार-चार संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. गट 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. गट 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहेत. गट 1 मधील सामने भारतात खेळवले जाणार आहेत, तर गट 2 मधील सामने श्रीलंकेत पार पडतील.

Continues below advertisement

21 फेब्रुवारी रोजी सुपर-8 फेरीतील पहिला सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

सुपर-8 गट :

गट 1 : भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वेगट 2 : पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका

सुपर-8 फेरीत आता प्रत्येक सामना ‘करो किंवा मरो’ असा असणार असून, उपांत्य फेरीसाठीची चुरस आणखी रंगणार आहे.

T20 विश्वचषक 2026: सुपर-8 वेळापत्रक

तारीखसामनामैदानवेळ (IST)
२१ फेब्रुवारीन्यूझीलंड vs पाकिस्तानआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोसंध्याकाळी ७:००
२२ फेब्रुवारीइंग्लंड vs श्रीलंकापल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडीदुपारी ३:००
२२ फेब्रुवारीभारत vs दक्षिण आफ्रिकानरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादसंध्याकाळी ७:००
२३ फेब्रुवारीझिम्बाब्वे vs वेस्ट इंडिजवानखेडे स्टेडियम, मुंबईसंध्याकाळी ७:००
२४ फेब्रुवारीइंग्लंड vs पाकिस्तानपल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडीसंध्याकाळी ७:००
२५ फेब्रुवारीन्यूझीलंड vs श्रीलंकाआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोसंध्याकाळी ७:००
२६ फेब्रुवारीवेस्ट इंडिज vs दक्षिण आफ्रिकानरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाददुपारी ३:००
२६ फेब्रुवारीभारत vs झिम्बाब्वेएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईसंध्याकाळी ७:००
२७ फेब्रुवारीइंग्लंड vs न्यूझीलंडआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोसंध्याकाळी ७:००
२८ फेब्रुवारीपाकिस्तान vs श्रीलंकापल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडियम, कँडीसंध्याकाळी ७:००
१ मार्चझिम्बाब्वे vs दक्षिण आफ्रिकाअरुण जेटली स्टेडियम, दिल्लीदुपारी ३:००
१ मार्चभारत vs वेस्ट इंडिजईडन गार्डन्स, कोलकातासंध्याकाळी ७:००