मुंबई : टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून पुढील वर्षी 7 फेब्रुवारीपासून हा थरार रंगणार आहे. सर्वांचं लक्ष लागलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 15 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. तसेच या विश्वचषकातील उपांत्य सामने हे कोलंबो आणि मुंबईमध्ये होणार आहेत. तर अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium Ahmedabad) होणार आहे. रोहित शर्मा हा टी-20 विश्वचषकाचा ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे.
यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद हे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे बजावणार असून एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. त्याचे चार गटात विभाजन करण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 15 फेब्रुवारी रोजी या दोन देशात सामना होणार आहे.
दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच भारतात आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईसह, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता आणि अहमदाबाद येथे होणार विश्वचषकाचे सामने तसेच श्रीलंकेतील चार ठिकाणी सामने होणार आहेत.
T20 World Cup 2026 Full Schedule : विश्वचषकाचे गट कोणते?
गट अ: भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलॅंड्स, नामिबिया
गट ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
गट क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
T20 World Cup 2026 India Matches : भारताचे सामने कधी?
15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान
7 फेब्रुवारी भारत विरुद्ध अमेरिका (मुंबई वानखेडे)
12 फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया (नवी दिल्ली)
18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)
रोहित शर्मा ब्रँड अॅम्बेसेडर
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी रोहित शर्माला 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केलं. रोहित शर्माने भारताला 2024 च्या टी-20 विश्वचषकाचे जेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर तो या फॉरमॅटमधून निवृत्त झाला. जय शाह म्हणाले की, अॅम्बेसेडरची भूमिका बजावण्यासाठी रोहित शर्मापेक्षा चांगला कोणीही असू शकत नाही. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून, रोहित शर्मा जागतिक स्तरावर टी-20 विश्वचषकाचा प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल.
ही बातमी वाचा: