T20 World Cup 2026 Points Table Group A Updated : टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेचं 7 फेब्रुवारीपासून बिगुल वाजलं. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एकूण तीन सामने खेळवले गेले. या सामन्यांमध्ये भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला, वेस्ट इंडिजने स्कॉटलंडवर 35 धावांनी मात केली, तर पाकिस्तानने नेदरलँड्सवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या तीन सामन्यांपैकी ग्रुप ए मधील दोन सामने तर ग्रुप सी मधील एक सामना पार पडला. ग्रुप सी च्या लढतीत वेस्ट इंडिजने विजय मिळवत 2 गुणांची कमाई केली. त्याचप्रमाणे पाकिस्ताननेही नेदरलँड्सला हरवत 2 गुण मिळवले.

Continues below advertisement

Continues below advertisement

पाकिस्तान कसाबसा जिंकला, पण टीम इंडियाने दिला धक्का...

यानंतर भारताने यूएसएवर विजय मिळवत 2 गुण आपल्या खात्यात जमा केले आणि ग्रुप ए च्या गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकले. सध्या ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे प्रत्येकी 2-2 गुण असले, तरी नेट रनरेटच्या आधारे भारत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यूएसएविरुद्धच्या विजयानंतर भारताचा नेट रनरेट 1.450 इतका झाला आहे, तर पाकिस्तानचा रनरेट 0.240 इतकाच आहे. या गटात नेदरलँड्स आणि यूएसए यांनीही प्रत्येकी एक सामना खेळला असून अद्याप त्यांचे गुण खाते उघडलेले नाही.

पाकिस्ताननं नेदरलँड्सवर केली तीन विकेट्सनं मात 

स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पाकिस्ताननं नेदरलँड्सवर तीन विकेट्सनं मात केली. या सामन्यात नेदरलँड्सनं पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची एकवेळ 7 बाद 114 अशी अवस्था झाली होती. मात्र फहीम अश्रफच्या तडफदार खेळीमुळे पाकिस्ताननं तीन चेंडू बाकी ठेऊन हा सामना जिंकला.

भारताची धमाकेदार सुरुवात

टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्याच सामन्यात भारताने अमेरिकेवर 29 धावांनी विजय मिळवत स्पर्धेला शानदार सुरुवात केली. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या गटसामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 84 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 161 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेच्या संघाला 20 षटकांत 8 गडी गमावत केवळ 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने सामना 29 धावांनी जिंकत गुणतालिकेत विजयी सुरुवात नोंदवली.

हे ही वाचा -

टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात कॅप्टन सूर्यानं लाज राखली अन् किंग कोहलीच्या अशक्यप्राय विक्रमाला सुद्धा गवसणी घातली! नेमकं घडलं तरी काय?