एक्स्प्लोर

Ind vs Pak Live : पाकिस्तानची बोलती बंद, टॉसच्या वेळी सूर्यकुमार यादवने नेमकं काय केलं? पाहा Video

India vs Pakistan No Handshake : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला आहे.

India vs Pakistan No Handshake : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2026 चा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला आहे. बऱ्याच वादविवादानंतर अखेर दोन्ही संघ मैदानात उतरले. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धची नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवत पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला. टॉसच्या वेळी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाशी हस्तांदोलन न करता थेट आपल्या भूमिकेची जाणीव करून दिली.

क्रिकेटमध्ये आयसीसी स्पर्धेत भारतीय कर्णधाराने प्रतिस्पर्धी कर्णधाराशी हस्तांदोलन न करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आशिया कप 2025 पासून हा पायंडा सुरू झाला असला, तरी आयसीसी स्पर्धेत अशी भूमिका प्रथमच पाहायला मिळाली. सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यांना हँडशेकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, “यासाठी उद्यापर्यंत थांबलेलं बरं,” असं सूचक उत्तर दिलं होतं. आणि अखेर टॉसच्या वेळी त्याने कृतीतूनच उत्तर दिलं.

दरम्यान, पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस हरल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाले, “आम्हाला आधी फलंदाजी करण्यास काहीच अडचण नाही. खरं तर आम्ही तेच करू इच्छित होतो. इथल्या परिस्थितीचा आणि आधीच्या दोन सामन्यांचा अनुभव आमच्या बाजूने आहे. आम्ही धावसंख्या बचावत दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळे संघात मोठे बदल करण्याची गरज वाटली नाही.”

भारतीय संघात 2 बदल... 

मागील सामना दुखापतीमुळे चुकवलेल्या अभिषेक शर्माची संघात पुनरागमन झाले आहे. तर खेळपट्टीच्या परिस्थितीचा विचार करून अर्शदीप सिंगऐवजी अतिरिक्त फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम अकरात स्थान देण्यात आले आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन :

अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :

सॅम अयूब, साहिबजादा फरहान, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, मोहम्मद नवाज, शादाब खान, फहीम अशरफ, उस्मान खान (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि उस्मान तारिक.

हे ही वाचा -

IND W vs AUS W 1st T20I : ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला! भारताने घरात घुसून उडवला धुरळा; 21 धावांनी ऐतिहासिक विजय

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
NZ vs SA Semifinal T20 World Cup 2026 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
दक्षिण आफ्रिका पुन्हा ‘चोकर्स’; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक; फिन अ‍ॅलनने ठोकले रेकॉर्डब्रेक शतक
IND vs ENG T20 World Cup Semi Final : ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
ईशान अन् संजू सलामीवीर, तर अभिषेक OUT? इंग्लंडविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची Playing-11, कोच स्पष्टच बोलला
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
जिंकण्याची कोणतीच हमी नाही...; इंग्लंडविरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या कोचचं धक्कादायक विधान, नेमकं काय म्हणाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget