टी-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) सुपर 12 च्या सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. सुपर 12 च्या फेरीतील पहिला सामना आस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात शेख जायद स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रिलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 9 विकेट्स गमावून केवळ 118 धावापर्यंत मजल मारता आली आहे.
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सुरुवात डगमगताना दिसला. सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या टेम्बा बवुमा (12) आणि क्विंटन डिकॉक (7) यांना जास्त धावा करता आल्या नाहीत. टेम्बा पाठोपाठ रस्सी दुस्सेनही (2) तंबूत परतला आहे. त्यानंतर हेन्रिच क्लासेनच्या (13) रुपाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का बसला. दरम्यान, मैदानात आलेल्या डेविड मिलर आणि मारक्रम जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर मिलर पायचीत झाला. त्यानंतर ड्वेन प्रेटोरियर (1), केशव महाराज (0) यांच्यापाठोपाठ अॅडन मारक्रम (40) माधारी परतला. दरम्यान, रबाडाने नाबाद 19 धावा केल्या आहे. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 118 धावापर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचल स्टार्क, जोश हेजलवूड, अॅडम झंपा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत. तर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा सुपर 12 फेरीतील पहिला खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.