एक्स्प्लोर

Suryakumar Yadav : पराभवानंतर टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; गौतम गंभीर, सपोर्ट स्टाफच्या प्लॅनवर सूर्या भडकला, नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs SA T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल 76 धावांनी पराभव करत धक्का दिला.

IND vs SA T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल 76 धावांनी पराभव करत धक्का दिला. या मोठ्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही नाराज दिसला. सामन्यानंतर डगआउटमध्ये तो चेहरा पाडून बसला होता. त्यानंतर त्याने गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसोबत सविस्तर चर्चा केली. पराभव कशामुळे झाली, कुठे चूक झाली आणि रणनीतीत काय त्रुटी राहिल्या यावर त्यांनी स्पष्ट मत मांडल्याचे दिसून आले.

पराभवानंतर डगआऊटमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार सपोर्ट स्टाफसोबत चर्चा करताना दिसतो. गौतम गंभीर त्याच्या प्रत्येक मुद्द्याकडे लक्षपूर्वक ऐकत असल्याचेही स्पष्ट होते. सामन्यापूर्वी आखलेल्या रणनीतीबाबत सूर्यकुमार नाराज असल्याचे त्याच्या देहबोलीवरून जाणवत होते. या पराभवाने सूर्यकुमार यादव खूपच निराश झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तर दुसरीकडे, सपोर्ट स्टाफ शांतपणे कर्णधाराचे म्हणणे ऐकत होता. या घडामोडींमुळे संघातील वातावरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा थरार (IND vs SA T20 World Cup 2026)

सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 187 धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 111 धावांवर गारद झाला. परिणामी भारताला 76 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.  

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर याने 63 धावांची स्फोटक खेळी करत सामन्याचं चित्रच पालटलं. त्याच्या आक्रमक फटक्यांनी भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने अवघ्या 24 चेंडूमध्ये 44 धावांची तुफानी खेळी साकारत डावाला निर्णायक वळण दिलं. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर स्टब्सने अक्षरशः धुरळा उडवला आणि तब्बल 20 धावा चोपल्या—इथेच सामना भारताच्या हातातून निसटला.

भारताकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सततच्या विकेट्समुळे दबाव वाढत गेला आणि धावगतीही खालावली. फक्त शिवम दुबेने 42 धावांची झुंजार खेळी करत थोडा प्रतिकार केला, पण तो अपुरा ठरला. एकंदरीत, दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील आक्रमक फलंदाजी आणि शेवटच्या षटकांतील धडाकेबाज फिनिशिंगमुळे भारताचा पराभव निश्चित झाला.

हे ही वाचा -

Team India Semifinal Scenario : 76 धावांचा घाव अन् स्वप्नांना तडा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, सेमीफायनलच्या शर्यतीतून OUT...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget