Suryakumar Yadav PC: एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आता टी20 मालिकेसाठी तयार झालाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याची मालिका गुरुवारपासून सुरु होत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करेल. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे, त्याआधी पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवातून सावरण्यासाठी वेळ लागेल.
त्यायाशिवाय पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव नियमित कर्णधार रोहित शर्माबद्दल म्हणाला की, या विश्वचषकात रोहित शर्माने कर्णधार म्हणून उदाहरण दिले. या विश्वचषकात रोहित शर्माने जे काही केले ते पूर्णपणे वेगळे होते. त्याला जे सांगितले होते ते त्याने केले. संघाच्या बैठकीत जे काही बोलले गेले ते मैदानावर केले. कर्णधार या नात्याने त्याने उदाहरण देऊन नेतृत्व केले. विश्वचषकाबाबत सूर्या म्हणाला की, 2023 च्या विश्वचषकात आम्ही सर्वजण अभिमान वाटावे असे खेळलोत.
भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आज जेव्हा मी खेळाडूंना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितले की जेव्हा आपण मैदानावर जातो तेव्हा आपण नि:स्वार्थपणे जावे. आपल्या विक्रमांसाठी खेळू नये. मी नेहमीच संघासाठी वैयक्तिक रेकॉर्डचा विचार करत नाही.
2021 पासून सूर्या भारताच्या टी20 संघाचा नववा कर्णधार -
2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आठ खेळाडूंनी भारताच्या टी20 संघाची धुरा संभाळली आहे. सूर्यकुमार यादव या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. 2021 च्या सुरुवातीला विराट कोहलीने 10 T20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यानंतर 2021 मध्ये शिखर धवन 3 सामन्यात, 2021-22 मध्ये रोहित शर्मा 32 सामन्यात, 2022 मध्ये ऋषभ पंत 5 सामन्यात, 2022-23 मध्ये हार्दिक पंड्या 16 सामन्यात, 2022 मध्ये केएल राहुल 11 सामन्यात कर्णधार होता. 2023 मध्ये जसप्रीत बुमराह 2 सामन्यांसाठी भारतीय T20 संघाची जबाबदारी स्वीकारली. 2023 मध्ये 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड भारतीय T20 संघाची जबाबदारी सांभाळेल. सूर्या हा या यादीतील नववा भारतीय कर्णधार असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची मालिका -
वनडे विश्वचषकानंतर आता भारतीय संघ टी20 साठी मैदानात उतरणार आहे. 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची टी20 मालिके रंगणार आहे. पहिला सामना विशाखापटनम येथील राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11, पिच रिपोर्ट आणि प्रिडिक्शन काय होईल, याबाबत जाणून घेऊयात.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार