Suryakumar Yadav Player Of The Series Marathi News : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 4–1 अशी आपल्या नावावर केली. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरवण्यात आले. पाच सामन्यांच्या मालिकेत सूर्याने एकूण 242 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेपूर्वी बराच काळ सूर्यकुमार यादवचा फॉर्म चर्चेत होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने जोरदार पुनरागमन करत आपल्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केले.

Continues below advertisement

प्लेअर ऑफ द सिरीज ठरल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला? 

Continues below advertisement

बर्‍याच काळानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी धावा केल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “खूप छान वाटत आहे. या क्षणाची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. हा वेळ कधी येईल, असे मी नेहमीच स्वप्न पाहत होतो. गेल्या एक वर्षापासून मी जे करत होतो, त्याच रूटीनवर ठाम राहिलो. मला माहीत होते की मी आउट ऑफ फॉर्म नव्हतो, फक्त धावा होत नव्हत्या.”

तो पुढे म्हणाला की, “ही मालिका खूप चांगली ठरली. अशा सकारात्मक भावनेसोबत विश्वचषकात जाणे खूपच खास असते. एक वर्षभर गोष्टी आपल्या बाजूने नव्हत्या, पण हेच आयुष्य आहे. मी ते स्वीकारले, पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि काय चुकत होते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मागील मालिकेनंतर मला दोन-तीन आठवडे मिळाले, ज्यात मी माझ्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवला. हीच एका खेळाडूची खरी आयुष्यशैली असते. क्रिकेटपुरतेच नव्हे, तर इतर क्षेत्रांतही अनेक करिअरमध्ये असे टप्पे येतात. मला खात्री होती की माझा वेळ नक्की येईल.”

टी-20  विश्वचषकाच्या तयारीवरही व्यक्त केले मत

टी-20 विश्वचषक 2026च्या तयारीबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “तुम्ही जिंका किंवा हराल, प्रत्येक सामन्यातून काही ना काही शिकायला मिळते. आम्ही मुंबईला गेल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळू. त्यानंतर मागील पाच सामने आणि संपूर्ण वर्षाचा आढावा घेऊ... आपण काय चांगले केले आणि कुठे सुधारणा करू शकतो. त्यानंतर आम्ही आमची विश्वचषक मोहीम सुरू करू.”

हे ही वाचा -

Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वात काळा दिवस; 4 षटकांत धू-धू-धुतले, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी धोक्याची घंटा