Suryakumar Yadav T20 Mumbai League 2025 : आयपीएल 2025 (IPL 2025) च्या हंगामात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, पण सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने. आपल्या क्लासिक फलंदाजीने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो टी-20 क्रिकेटचा 'Mr. 360' आहे. या हंगामात सूर्या फॉर्ममध्ये होता, त्याने खेळलेल्या अनेक सामन्यांमध्ये संघासाठी मॅचविनिंग इनिंग्स खेळल्या. सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी 16 सामने खेळले. संपूर्ण हंगामात त्याने 717 धावा केल्या आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. 

आयपीएल संपल्यानंतर सुर्या आता टी-20 मुंबई लीगमध्ये खेळत आहे आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने अद्भुत खेळी खेळली. त्याने एका सामन्यात अर्धशतक आणि दुसऱ्या सामन्यात 40 पेक्षा जास्त धावांची खेळी केली, यावरून असे दिसून येते की टी20 क्रिकेटमध्ये त्याची बॅट आग ओकत आहे.

सूर्यकुमार टी-20 मुंबई लीगमध्ये ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई संघाचे नेतृत्व करत आहे. जरी त्याने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले, ज्यामध्ये संघाचा पराभव झाला होता. परंतु पुढच्या सामन्यात त्याची 42 धावांची खेळी फायद्याची ठरली. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 135.48 होता. जरी तो लवकर आऊट झाला असला तरी त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले होते, त्यानंतर नंतर सिद्धांत अधातरावने अर्धशतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमार यादवने गेल्या 18 डावांमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये किमान 26 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने या काळात 73 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक ट्रॉफी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु क्वालिफायर 2 मध्ये संघ पंजाब किंग्जकडून पराभूत झाला. त्या सामन्यातही त्याने 26 चेंडूत 44 धावा केल्या. पण, आयपीएलपूर्वीच्या टी-20 मालिकेत इंग्लंडविरुद्ध त्याची बॅट चालली नाही. शेवटच्या सामन्यात तो दुहेरी आकडाही ओलांडू शकला नाही.

हे ही वाचा -

Ind vs Eng Test Series : भारत-इंग्लंड कसोटी स्पर्धेचे नाव बदललं, दिग्गज भारतीय खेळाडूऐवजी तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी नामांतर, सुनील गावसकर संतापले

IND Vs ENG Test Series : इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोच गौतम गंभीरच्या डोक्यात कोणता मास्टर प्लॅन? म्हणाला, '1000 धावा करुनही पराभव होऊ शकतो, जिंकण्यासाठी...'

IPL Umpires Salary 2025: आयपीएल आणि भारतीय क्रिकेटमध्ये पंच किती पैसा कमवतात हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!