एक्स्प्लोर

T20 Mumbai League 2025 : 'लोकल हिरो'समोर आयपीएलचा स्टार सूर्यकुमार यादव फिका पडला! वादळी अर्धशतक व्यर्थ, संघाचा पराभव

भारतीय संघाचा ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टी-20 मुंबई लीग 2025 च्या पहिल्याच दिवशी 25 चेंडूंत वादळी अर्धशतक झळकावले.

मुंबई, 4 जून 2025 : भारतीय संघाचा ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टी-20 मुंबई लीग 2025 च्या पहिल्याच दिवशी 25 चेंडूंत वादळी अर्धशतक झळकावले. पण, साईराज पाटीलने वादळी खेळी करताना इगल ठाणे स्ट्रायकर्सला डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे झालेल्या लढतीत ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर पाच विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 
 
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टसाठी  सूर्यकुमार (50) आणि जिगर राणा (53) यांनी चांगली खेळी केली. त्याच्या जोरावर नाईट्सने 7 बाद 179 धावा केल्या. संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नाही, परंतु राणा आणि परिक्षित वलसंगकर यांनी 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून डाव सावरला. राणा संथ चेंडूवर बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात परिक्षित धावबाद झाला, तेव्हा सूर्यकुमारने संघाची सूत्रे हाती घेतली. 

भारताच्या या स्टार खेळाडूला जय जैन (24) ची चांगली साथ मिळाली. या जोडीने मधल्या षटकांमध्ये 40 धावा जोडल्या आणि डाव स्थिर ठेवला. अमित पांडेने ही जोडी तोडली आणि यष्टीरक्षक अनिश चौधरीने जैनला यष्टिचीत केले.  सूर्यकुमारने डेथ  ओव्हर्समध्ये सुरेख फटकेबाजी करून नाईट्सना मजबूत फिनिशिंगपर्यंत पोहोचवले.

प्रत्युत्तरादाखल, वरुण लवांडेने 38 चेंडूत 57 धावा करत स्ट्रायकर्सचा पाठलाग सुरू ठेवला आणि अर्ध्या धावसंख्येपर्यंत त्यांना 89/1 अशी मजबूत धावसंख्या गाठून दिली. अनिश (37) सोबत त्याने 73 धावांची भागीदारी करून एक भक्कम पाया रचला, परंतु नाईट्सने दोन जलद विकेट्स घेतल्यानंतर हा वेग काही काळासाठी कमी झाला. साईराज पाटीलच्या येण्याने स्ट्रायकर्स स्पर्धेत टिकून राहिले आणि त्याने 22 चेंडूत नाबाद 47 धावा करताना चार षटकार मारले आणि त्याच्या संघाचा विजय निश्चित केला.

सोबो मुंबई फाल्कन्स, एमएससी मराठा रॉयल्स यांचा विक्रमी विजय

यापूर्वी, डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, सोबो मुंबई फाल्कन्सने आर्क्स अंधेरीचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. फाल्कन्सचा डाव सुरू होण्यापूर्वीच पावसाने खोडा घातला होता. फलंदाजीसाठी आलेल्या फाल्कन्सचा खेळ थांबला, तेव्हा त्यांच्या 1 बाद 26 धावा झाल्या होत्या. सलामीवीर इशान मुलचंदानी (5 चेंडूत 8) याला आर्क्स अंधेरीचा फिरकीपटू मुशीर खानने बाद केले. जोरदार पावसामुळे सामना लवकर थांबवला गेला तेव्हा स्टँड-इन कर्णधार अंग्रीश रघुवंशी (नाबाद 15) आणि अमोघ भटकल (नाबाद 1) क्रीजवर होते.

परिणामी सुपर ओव्हरमध्ये, फाल्कन्सकडून आकाश पारकरने 27 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आर्क्स अंधेरीचा संघ डगमगला आणि फक्त 13 धावाच करू शकला, ज्यामुळे सोबो मुंबई फाल्कन्सचा विजय झाला.

देशभरातील सर्वोत्तम घरगुती टी-20 लीगपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप, एमसीएचे माजी अध्यक्ष डॉ. विजय पाटील, लीग गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या उपस्थितीत डीवाय पाटील स्टेडियमवर झाले.

आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला दिवसाचा दुसरा सामनाही पावसामुळे प्रभावित झाला आणि तो नऊ षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने रोहन राजेच्या 21 चेंडूत 48 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 4 बाद 96 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टायगर्सना 5 बाद 88 धावाच करता आल्या. मॅक्सवेल डेव्हिड स्वामिनाथनने गोलंदाजीत दमदार कामगिरी करत दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि रॉयल्सचा आठ धावांनी विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक:

सामना 1 : सोबो मुंबई फाल्कन्स: 27 (आकाश पार्कर 27) सुपर ओव्हरमध्ये वि. वि. आर्क्स अंधेरी : 13 (शिवम दुबे १२, मुशीर खान १).

सामना २ : मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स: 96/4 (रोहन राजे 48 नाबाद) वि. वि. आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस: 88/5 (जय बिस्ता 23; मॅक्सवेल स्वामिनाथन 2/15).

सामना 3 : ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट : 179/6 (जिगर राणा 53, सूर्यकुमार यादव 50 नाबाद) पराभूत वि. इगल ठाणे स्ट्रायकर्स : 181/5 (वरुण लवंडे 57, सियाराज पाटील 47 नाबाद)

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: टीम फोटो काढल्यानंतर MS धोनी स्वत: खूर्ची उचलून चालत निघाला; पुढे जे घडलं, त्यानंतर अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
टीम फोटोनंतर MS धोनी स्वत: खूर्ची घेऊन निघाला; पुढे जे घडलं, अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Embed widget