Suryakumar Yadav GT vs MI IPL 2026 : आयपीएल 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या दुस्वप्नासारखा ठरत आहे. पाचपैकी चार सामने गमावून गुणतालिकेत तळात असलेल्या मुंबईला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे त्यांचा सर्वात भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या खराब फॉर्मचा. गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सूर्या पुन्हा एकदा अपयशी ठरला. कागिसो रबाडाच्या एका तुफानी चेंडूवर सूर्याचा ज्या पद्धतीने त्रिफळा उडाला, ते पाहून चाहते विचारत आहेत,'सूर्याचा मावळतीचा काळ सुरू झाला आहे का?'

Continues below advertisement

Continues below advertisement

रबाडाचा 'यॉर्कर' अन् सूर्याची दाणादाण

गुजरात टायटन्सने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 25 धावांवर दोन गडी बाद झाले. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात चेंडू कागिसो रबाडाच्या हातात होता. रबाडाने आपल्या अनुभवाचा वापर करत पाचव्या चेंडूवर असा काही वार केला की सूर्याला सावरण्याची संधीच मिळाली नाही. रबाडाने 152.1 किमी प्रतितास वेगाने एक वेगवान इन-स्विंगर टाकला. सूर्या ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडूची गती इतकी होती की बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला. सूर्या फक्त 10 चेंडूत 15 धावा करून माघारी परतला. बाद झाल्यानंतर तो स्वतःच थक्क होऊन पाहत राहिला.

सातत्याने अपयश; मुंबईची चिंता वाढली

सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रिकेटमधील जगातील अव्वल फलंदाज मानला जातो. मात्र, आयपीएल 2026 मध्ये त्याची आकडेवारी त्याच्या नावा साजेसी नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने 51 धावांची एक खेळी सोडली, तर उर्वरित सामन्यांत तो सपशेल फ्लॉप ठरला आहे. यंदाच्या हंगामातील त्याचे स्कोअर 16,51,06,33,0,15 आहे.  भारतीय टी-20 संघाचा कर्णधार असलेल्या खेळाडूचा हा फॉर्म केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नाही, तर आगामी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दृष्टीने भारतीय क्रिकेटसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटच्या स्थानी 

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 4 सामने गमावले आहेत. सध्या संघ पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे. मधल्या फळीत सूर्याची बॅट शांत असल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता येत नाहीये. सोशल मीडियावरही सूर्याच्या या खराब फॉर्मवर नेटिझन्सनी टीका करायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा -

बापाचं स्वप्न आणि विदर्भाची शान! कोण आहे दानिश मालेवार?, ज्याने मुंबईच्या संघात थेट रोहित शर्माची जागा घेतली