Suresh Raina Summon ED: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला ईडीकडून समन्स (Suresh Raina Summon ED) बजावण्यात आले आहे. सुरेश रैनाला आज (13 ऑगस्ट) दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. बेकायदेशील बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet प्रकरणी सुरेश रैनाला ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहेत. ईडीकडून आज आणि उद्या सुरेश रैनाचा जबाब नोंदवला जाईल. यापूर्वी, ईडीच्या तपास पथकाने 'परिमॅच' या बेटिंग अॅप चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, जयपूर, मदुराई आणि सुरतमधील 15 ठिकाणी छापे टाकले होते.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, बेटिंग अॅप 1xBet ने सुरेश रैनाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी, या बेटिंग कंपनीने म्हटले होते की सुरेश रैनासोबतची ही भागीदारी त्यांच्या कंपनीला चाहत्यांना बेटिंग करण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करेल. अलिकडच्या काळात, ईडीने बेटिंग आणि बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या अनुप्रयोगांवर कठोर भूमिका स्वीकारली आहे आणि सतत तपास मोहिम राबवल्या आहेत. प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि व्यक्तिमत्त्वांकडून केल्या जाणाऱ्या बेटिंग अॅप्सच्या जाहिरातींमुळे ईडीने कठोर कारवाई देखील केली आहे.

सुरेश रैनाचा जबाब नोंदवला जाणार-

सदर प्रकरणाचा तपास 2024 मध्ये मुंबई पोलिस ठाण्यात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरू झाला. प्राथमिक तपासात असे दिसून आले की फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून गोळा केलेले पैसे एका म्युल अकाउंट/बेकायदेशीर खात्यात जमा केले गेले होते. हे पैसे अनेक एजंट्सद्वारे वितरित केले गेले. एका वृत्तानुसार, ही रक्कम 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. सुरेश रैना बेटिंग कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याने, आज या प्रकरणात त्याचे जबाब नोंदवले जाईल.

चेन्नई सुपर किंग्समध्ये सुरेश रैनाची एन्ट्री निश्चित

आयपीएल 2025 चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी खास राहिला नाही.  या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा संघ 10 व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नईच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स सुरेश रैनाला संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चेन्नईत चिन्ना थाला म्हणून ओळख मिळवणाऱ्या सुरेश रैनाची एन्ट्री जवळपास निश्चित झाल्याचेही बोलले जात आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Akash Deep Buys New Fortuner: नवीन फॉर्च्युनर खरेदी करताच आकाशदीपला आरटीओने धाडली नोटीस; गाडी चालवताना दिसल्यास...