(Source: ECI | ABP NEWS)
Suresh Raina : WCL फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव, सुरेश रैनाचा सडेतोड टोला, म्हणाला, 'आमच्यासमोर आले असते, तर मैदानातच...'
World Championship of Legends final Pakistan vs South Africa : या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 60 चेंडूत 120 धावांची जबरदस्त खेळी करत सामना एकहाती फिरवला.

Suresh Raina on Pakistan Cricket WCL final : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) च्या थरारक अंतिम सामन्यात साउथ आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा 9 गडी राखून दणक्यात पराभव करत किताबावर मोहोर उमटवली. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 60 चेंडूत 120 धावांची जबरदस्त खेळी करत सामना एकहाती फिरवला. त्याच्या या शतकी खेळीचा दरम्यान स्ट्राइक रेट 200 चा होता, ज्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी पाहता पाहता व्हायरल झाली. रैनाने साउथ आफ्रिकेच्या विजयाचं अभिनंदन केलं, पण त्याचसोबत पाकिस्तानविरोधातील आपला रोखाही स्पष्ट केला.
काय म्हणाला सुरेश रैना?
रैनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "एबी डिव्हिलियर्स अंतिम सामन्यात काय मस्त खेळला. खरंच धमाका केला त्यानं. पण जर आम्ही (इंडिया चॅम्पियन्स) स्पर्धेतून नाव मागे घेतलं नसतं, तर पाकिस्तानलाही असंच हरवलं असतं. पण देश सर्वोच्च आहे. ‘EasyMyTrip आणि NishantPitti’ यांचा आदर कारण ज्यांनी ठामपणे पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही सामन्याला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला. हेच खरे व्यक्तिमत्व आहे.
What a knock by @ABdeVilliers17 in the final, absolutely smashed it
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 2, 2025
Had we played, we would’ve crushed them too, but we chose our nation above everything else.
Full respect to @EaseMyTrip and @nishantpitti for standing firm and not supporting any match involving them. That’s…
पाकिस्तानविरुद्ध का खेळला नाही भारत?
भारताने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील वातावरण अस्वस्थ होतं. देशहित आणि जनभावना लक्षात घेऊन भारताच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.
सामना कसा झाला?
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. जिथे, प्रथम फलंदाजी करताना, पाकिस्तानने बोर्डवर 195/5 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्ससमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले.
आफ्रिकन संघाने फक्त एका विकेटच्या मोबदल्यात लक्ष्याचा पाठलाग केला आणि 9 विकेटने शानदार विजय मिळवला. अंतिम सामन्यात, एबी डिव्हिलियर्सच्या आक्रमक खेळीने सामन्याचा संपूर्ण रंगच बदलून टाकला. एबी डिव्हिलियर्सने 120 धावांची शतकी खेळी केली. या दरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 200 होता, त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 7 षटकार लागले.
हे ही वाचा -





















