बंगळुरु : रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहितनं शतक झळकावलं. तर कर्णधार विराट कोहलीचं मात्र शतक हुकलं.


तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोहलीने फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही आपला दमदार ठसा उमटवला. या सामन्यात कॅप्टन कोहली चक्क सुपरमॅन बनलेला पाहायला मिळाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत टीम इंडियाला 286 धावांचं आव्हान दिलं. यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांची दमदार भागीदारी पाहायला मिळाली, परंतू ही तोडण्यासाठी विराटने एक तुफान कॅच पकडला.

सामन्यातील रविंद्र जडेजाने टाकलेल्या 32व्या ओवरला मार्नस लाबुशेन स्ट्राईकला होता. रविंद्र जडेजाने टाकेलल्या चेंडूवर लाबुशेनने कवरला फटका मारला. यावेळी कवरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने ही कॅच पकडला आणि सर्वांनाचं धक्का बसला. विराट कोहलीने सुपरमॅनसारखी हवेत उडी घेत ही कॅच पकडली. या कॅचनंतर रविंद्र जडेजाने लगेचंच कोहलीकडे जाऊन प्रशंसा केली. सध्या सोशल मीडियावर कोहलीची ही कॅत व्हायरल होतं आहे.


दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान सात विकेट्स आणि चेंडू राखून पार केलं. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या रोहितनं शतक झळकावलं. तर कर्णधार विराट कोहलीचं मात्र शतक हुकलं. विराट आणि रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी 137 धावांची निर्णायक भागीदारी साकारली. रोहितनं 119 तर विराटनं 89 धावांची खेळी केली.

त्याआधी स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत नऊ बाद 286 धावांची मजल मारली होती. स्मिथनं कारकीर्दीतलं नववं वन डे शतक साजरं करताना 131 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय मार्नस लाबुशेननंही 54 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानं दोन तर कुलदीप यादव आणि नवदीप सैनीनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

ICC Awards 2019 | विराट कोहलीला स्पिरीट ऑफ क्रिकेट पुरस्कार | खेळ माझा | ABP Majha



संबंधित बातम्या :

India vs Australia | रोहित शर्माचा नवा विक्रम, जलद 9 हजार धावांचा टप्पा पार


INDvsAUS | टीम इंडियाचा मालिका विजय, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित, विराटची शानदार फलंदाजी


माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांना टीम इंडियाची मैदानावर अनोखी आदरांजली