Sunil Gavaskar On KL Rahul : नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 4 विकेट्सनी सहज विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आघाडी घेतली. भारतीय संघाकडून, कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल देखील या सामन्यात अपयशी ठरला. या दोन्ही फलंदाजांना प्रत्येकी फक्त दोन धावा करता आल्या.

त्यामुळे केएल राहुल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनीही राहुलवर असाच प्रश्न उपस्थित केला आहे. गावसकर यांनी केएल राहुलला असा सल्लाही दिला की, क्रिकेट हा एक टीमचा खेळ आहे, तुम्हाला इथे स्वतःसाठी खेळण्याची गरज नाही. गावसकर यांच्या विधानावरून असे दिसते की केएल राहुल संघासाठी नाही तर स्वतःसाठी फलंदाजी करतो. पण गावसकर यांनी काय विधान केले आहे ते नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊया... 

गावसकर यांनी राहुलवर उपस्थित केले प्रश्न ...

गावसकर यांनी कॉमेंट्री करताना सांगितले की, राहुलने येताच बचावात्मक क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो म्हणाला, 'तुम्हाला जास्त बचावात्मक असण्याची गरज नाही.' हा एक टीमचा खेळ आहे. तो खराब शॉट खेळून आऊट झालास.' क्रीजवर आल्यानंतर राहुल बराच वेळ घेत असल्याचे दिसून आले, पण नवव्या चेंडूवर आदिल रशीदने त्याला आऊट केले. राहुलला वाटत होते की,  गिलने त्याचे शतक पूर्ण करावे, पण त्या नादात तो स्वतः बाद झाला आणि नंतर गिललाही शतक करता आले नाही. त्याची विकेट 87 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पडली.

केएल राहुलच्या जागेवर प्रश्न

पण, नागपूर एकदिवसीय सामन्यात केएल राहुलला अंतिम अकरा संघात स्थान देण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी एका निवेदनात म्हटले होते की, संघाचा मुख्य यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आहे. परंतु कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक गंभीर यांनी राहुलला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्यास भाग पाडले. 

राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि तो अपयशी ठरला. बरं, राहुलच्या अपयशाचा टीम इंडियावर फारसा परिणाम झाला नाही, कारण टीमने इंग्लंडला 4 गडी राखून पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे आणि पुढचा सामना रविवारी खेळला जाईल.

हे ही वाचा -

Champions Trophy 2025 : दुष्काळात तेरावा महिना! स्टार खेळाडूने मालिकेतून घेतली माघार, अचानक गेला लंडनला; चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर