SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये

SRH vs RR Eliminator Live Update IPL 2026 : आज आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आणि यांच्यात जबरदस्त लढत रंगणार आहे.

किरण महानवरLast Updated: 27 May 2026 11:27 PM

पार्श्वभूमी

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Eliminator Live Update IPL 2026 : आज आयपीएल 2026 च्या एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आणि यांच्यात जबरदस्त लढत रंगणार आहे. न्यू चंदीगडमधील महाराजा...More

SRH vs RR Eliminator IPL 2026 : वैभव सुर्यवंशीच्या वादळी 97 धावा; हैदराबादचा धुव्वा उडवत राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये

एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत केल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 च्या क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे.


मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात, राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला 47 धावांनी पराभूत केले. 


या पराभवामुळे हैदराबादच्या स्पर्धेतील वाटचालीस पूर्णविराम लागला. 


244 धावांचे लक्ष्य समोर असताना, हैदराबादचा संघ 196 धावांवर सर्वबाद झाला. 


29 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल, ज्यांनी क्वालिफायर-1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध पराभव पत्करला होता.