SRH vs RCB Live Score IPL 2026 Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मधील 67वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे रंगणार आहे.
किरण महानवरLast Updated: 22 May 2026 11:35 PM

पार्श्वभूमी
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मधील 67वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे रंगणार आहे. या लढतीत सनरायझर्स...More
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Live Update IPL 2026 In Marathi : आयपीएल 2026 मधील 67वा सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे रंगणार आहे. या लढतीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आमनेसामने भिडणार आहेत. लीग टप्प्यातील दोन्ही संघांचा हा अखेरचा सामना असून प्लेऑफपूर्वी टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी ही निर्णायक जंग ठरणार आहे. गतविजेता आरसीबी सध्या 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. 10 संघांमध्ये त्यांचा +1.065 असा सर्वोत्तम नेट रनरेट आहे. आजचा सामना जिंकल्यास आरसीबीला पहिलं स्थान निश्चित करता येणार असून अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचे 13 सामन्यांत 16 गुण आहेत आणि संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स संघाचेही 18 गुण आहेत. मात्र गुजरातचा नेट रनरेट +0.695 इतका मजबूत आहे, तर हैदराबादचा नेट रनरेट +0.350 आहे. त्यामुळे टॉप-2 मध्ये झेप घेण्यासाठी हैदराबादला आज आरसीबीवर मोठ्या फरकाने विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. प्लेऑफपूर्वीची ही सुपरहिट लढत आता चाहत्यांसाठी जबरदस्त थरार घेऊन येणार आहे.
SRH vs RCB Live Score IPL 2026 Update : हैदराबादने आपला शेवटचा सामना जिंकला, पराभवानंतरही आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थानी, SRHने RCBला 55 धावांनी लोळवलं
आज 22 मे रोजी आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूयांच्यात सामना झाला. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑरेंज आर्मीने 255 धावा केल्या. 256 धावांचे लक्ष्य गाठताना आरसीबीला फक्त 200 धावाच करता आल्या.