एक्स्प्लोर

SA vs WI Super-8 T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट विंडिजचा फडशा पाडला! Point Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची चांदी, थेट...

South Africa beat West Indies Super-8 T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये आता कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.

South Africa beat West Indies Super-8 T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये आता कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. गुरुवारी अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या 47 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाने गुणतालिकेत मोठी उलथापालथ केली असून, या निकालामुळे भारतीय संघासाठी देखील उपांत्य फेरीची (Semi-Final) दारे उघडली गेली आहेत. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 4 गुणांची कमाई करत पॉइंट्स टेबलमध्ये थेट अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

वेस्ट इंडिजची टॉप ऑर्डर स्वस्तात तंबुत...

या सामन्यात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि शाई होप डावाची सुरुवात करण्यासाठी आले. त्यांनी 2.2 षटकांत पहिल्या विकेटसाठी 29 धावा चोपल्या. संघाला पहिला धक्का कर्णधार शाई होपच्या (16 धावा) रूपात बसला. होपनंतर हेटमायर (2 धावा),  किंग (21 धावा), रोव्हमन पॉवेल (9), रोस्टन चेस (2), शेरफेन रुदरफोर्ड (12) आणि मॅथ्यू फोर्ड (11) देखील बाद झाले. 83 धावांत 7 विकेट गमावल्यानंतर, रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी वेस्ट इंडिज संघाची धुरा हाती घेतली.

जेसन होल्डर अन् रोमारियो शेफर्डचा तांडव...

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 31 चेंडूत 49 धावा केल्या. रोमारियो शेफर्डने 37 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने तीन, तर कॉर्बिन बॉश आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

एडेन मार्कराम आणि क्विंटन डेकॉकने विंडिजच्या गोलंदाजांना धू धू धुतलं...

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मिलाफ साधला. एडेन मार्कराम आणि क्विंटन डेकॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भक्कम भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. डिकॉकने अवघ्या 24 चेंडूमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या जोरावर 47 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र रोस्टन चेज याने डिकॉकला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर एडेन मार्कराम आपलं अर्धशतक पुर्ण केले. 

अवघ्या एका विकेटच्या मोबदल्यात त्यांनी हे लक्ष्य गाठत 9 विकेट्सने सामना खिशात घातला. विंडिजचा पराभव आणि आफ्रिकेची आगेकूच यामुळे आता स्पर्धेतील रंगत वाढली असून, भारताच्या सेमीफायनल प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. 

भारतासाठी कसं खुलं झालं दार? (Team India Semifinal Scenarios)

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग तुलनेने सोपा झाला आहे. आता समीकरण स्पष्ट आहे, भारताने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आज भारताचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यास संघाचा आत्मविश्वास दुणावेल आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा सामना ‘करो या मरो’ ठरेल. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या या गिफ्टचा भारत कितपत फायदा करून घेतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

331.58 चा स्ट्राइक रेट अन् वैभव सूर्यवंशीचा तांडव! फक्त 14 चेंडूत ठोकले अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचाही धुमाकूळ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
कुलदीप IN, वरुण OUT...; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
अक्षर पटेलने ते दोन अफलातून कॅच कसे पकडले? मनात नेमकं काय चाललं होतं? 'बापू'चा व्हिडीओ व्हायरल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget