एक्स्प्लोर

Ind vs Sa Super 8 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा 'फुसका' बार, ICC च्या स्पर्धेत अहमदाबादमध्ये भारत पुन्हा पराभूत, लाखो प्रेक्षक, कोट्यवधी चाहत्यांमध्ये सन्नाटा

South Africa beat India Super 8 ICC T20 World Cup 2026 : अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय... हे समीकरण जणू आता पाचवीलाच पुजलंय.

South Africa beat India Super 8 ICC T20 World Cup 2026 : अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम आणि भारतीय चाहत्यांचे तुटलेले हृदय... हे समीकरण जणू आता पाचवीलाच पुजलंय. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील त्या पराभवाच्या आठवणी अजून पुसल्या गेल्या नव्हत्या, तोच याच मैदानावर आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवासोबतच भारताची सेमीफायनलची वाट बिकट झाली असून, अहमदाबादचे मैदान भारतीय संघासाठी 'अनलकी' ठरत असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे.

सुरुवातीला बुमराह-अर्शदीपचा कहर

सुपर-8 सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 20 धावांवर संघाने तीन महत्त्वाचे बळी गमावले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने क्विंटन डी कॉकला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) कर्णधार एडेन मार्करमला केवळ 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चौथ्या षटकात पुन्हा बुमराहने रयान रिकेल्टनला 7 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला.

डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलरचा तांडव

यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करत संघाचा डाव 1000 धावांच्या पार नेला. मात्र, शिवम दुबेने ब्रेविसला बाद करत ही जोडी फोडली. ब्रेविसने 29 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी केली, यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

भारतासमोर 188 लक्ष्य  

दरम्यान, डेव्हिड मिलरनेही तुफानी फलंदाजी करत 35 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार होते. अखेरीस त्याला वरुण चक्रवर्तीने बाद केले. शेवटच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूत नाबाद 44 धावांची झंझावाती खेळी करत संघाचा डाव 187 धावांपर्यंत पोहोचवला. त्याने 1 चौकार आणि 3 षटकार लगावले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने 2 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव रोखला.

पॉवरप्लेमध्ये 31 धावांवर 3 मोठे धक्के...

188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेच्या 6 षटकाअखेर भारताने 31 धावांवर आपले 3 महत्त्वाचे फलंदाज गमावले आहेत. सलामीवीर ईशान किशन शून्यावर बाद झाला, तर तिलक वर्मा (1) आणि अभिषेक शर्मा (15) हे देखील झटपट माघारी परतले. त्यानंतर या पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरदेखील बाद झाला असून त्याने 11 चेंडूत 11 धावा केल्या. सूर्यकुमार यादव काही वेळ स्थिर राहिला, तर हार्दिक पांड्या 18 धावा करून बाद झाला. 8 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या 88 पर्यंत पोहोचली.  टीम इंडियासाठी, फक्त शिवम दुबे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर टिकू शकला. त्याने 37 चेंडूत 42 धावा केल्या. पण टीम इंडियाला फक्त 111 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांनी हरवून धक्का दिला. मैदान भारतीय होते, चाहते भारतीय होते आणि परिस्थिती टीम इंडियाला अनुकूल होती, परंतु दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. 

सुपर-8ची समीकरणे बदलली

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 च्या गुणतालिकेत (Points Table) आपले खाते उघडले असून 2 गुण पटकावले आहेत. भारतासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतासाठी पुढचे सर्व सामने 'करो या मरो' अशा स्थितीतील असतील.

26 फेब्रुवारी – झिम्बाब्बे विरुद्ध, चेन्नई

1 मार्च – वेस्ट इंडिज विरुद्ध, कोलकाता

हे ही वाचा -

Smriti Mandhana : तुमच्या भावनांची कोणाला पडलीये...; स्मृती मानधानाची 'ती' पोस्ट अन् क्रिकेटविश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये मिळालेला विजय हा अभूतपूर्व, विराट कोहलीकडून खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक
Abhishek Sharma Ind vs Nz : स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
स्वतःवर विश्वास उरला नव्हता, पण... वर्ल्डकप जिंकताच अभिषेक शर्मा मनातलं सगळं बोलला; गौतम गंभीरबाबत मोठा खुलासा
T20 World Cup 2026 :  फायनलमध्ये भारतानं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच देश
T20 World Cup 2026 :  फायनलमध्ये भारतानं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच देश
Team India Champions T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक! नरेंद्र मोदी स्टेडियमची माती कपाळावर लावून केला सलाम, Video
भारतमातेला सलाम, कपाळावर माती लावून कृतज्ञता, विश्वविजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget