(Source: Poll of Polls)
World Cup Points Table : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?
ICC Women Cricket World Cup Points Table Updated : महिला विश्वचषक 2025 मधील 14 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 3 गडी राखून रोमांचक विजय मिळवला.

ICC Womens World Cup Points Table Update : महिला विश्वचषक 2025 मधील 14 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर (South Africa beat Bangladesh) 3 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकन संघाने (South Africa third with win) पॉइंट्स टेबलमध्ये झेप घेत तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. मात्र, त्यांच्या या विजयामुळे आणि बांगलादेशच्या पराभामुळे सर्वाधिक फटका भारतीय संघाला बसला आहे, कारण टीम इंडिया आता चौथ्या स्थानी घसरली आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 3 विजय आणि 6 गुण आहेत, तर भारताकडे 4 गुण आहेत.
पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल, टीम इंडियाची घसरण (ICC Women Cricket World Cup Points Table Updated)
विश्वचषक 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia continue on top) पहिल्या स्थानावर आहे. भारतावरच्या विजयाने त्यांनी अव्वल स्थान पक्कं केलं आहे. त्यांच्या खात्यात एकूण 7 गुण आहेत. श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांना अजूनपर्यंत एकही पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. इंग्लंडने आपले तिन्ही सामने जिंकून दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +1.353 आहे, तर इंग्लंडचा +1.864 आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट -0.618 इतका आहे. सध्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत हे चार संघ पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-4 मध्ये आहेत.
टीम इंडियावर टॉप-4 मधून बाहेर पडण्याचा धोका
टीम इंडिया तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे. सलग दोन सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला गेल्या दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे त्यांना टॉप-4 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. पुढील सर्व सामने भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. टीम इंडियाने आगामी तीन सामन्यांमधून एकही सामना गमावला तर सेमीफायनलचा मार्ग खूप कठीण होईल. टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांना अजूनही न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांशी खेळावे लागणार आहे.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली लढत
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दक्षिण आफ्रिकेने 233 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात बांगलादेशवर 3 गडी राखून विजय मिळवला. 78 धावांवर 5 गडी गमावल्यावर आफ्रिकन संघ अडचणीत आला होता, पण मारिजान कॅप आणि क्लोई ट्रेयॉन यांच्या संयमी खेळीमुळे संघाला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी बांगलादेशने 6 गडींवर 232 धावा केल्या होत्या. शर्मिन अख्तर (50 धावा, 77 चेंडू) आणि शोरना अख्तर (51 नाबाद, 35 चेंडू) यांनी अर्धशतकी खेळी केली. क्लोई ट्रेयॉनला तिच्या सर्वांगीण कामगिरीसाठी सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आलं. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली, तर बांगलादेशला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. (World Cup Points Table Update till Ban vs SA result on October 13)
हे ही वाचा -
















