Sourav Ganguly Head Coach Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2027 पूर्वी मोठा निर्णय घेत माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांची संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गांगुली याआधी दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करीत होते. मात्र, आयपीएलमध्ये दिल्लीच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असेल. गांगुली यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या पुरुष आणि महिला संघाचे क्रिकेट संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते 2019 पासून दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीशी जोडलेले आहेत.

Continues below advertisement

हेमांग बदानींची जागा घेणार

Continues below advertisement

सौरव गांगुली आता हेमांग बदानी यांची जागा घेतील. बदानी गेल्या दोन हंगामांपासून दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीला सलग दोन हंगामांत प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा संघ पाचव्या, तर 2026 मध्ये सहाव्या स्थानावर राहिला. त्यामुळे फ्रँचायझीने कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गांगुलीच्या नियुक्तीसोबतच गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल, सहाय्यक प्रशिक्षक इयान बेल आणि संघ संचालक वेणुगोपाल राव यांनाही कायम ठेवण्यात आलेले नाही. गांगुलीला त्याचा स्वतःचा सपोर्ट स्टाफ हवा असल्याचे वृत्त आहे.

युवराज सिंगचीही एन्ट्री? 

सौरव गांगुलीच्या आगमनानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी एका दिग्गजाची एन्ट्री होण्याची चर्चा रंगली आहे. युवराज सिंग गांगुलीसोबत दिल्लीच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. गांगुली यांनी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एसए-20 स्पर्धेत प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

गांगुली काय म्हणाले?

दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर सौरव गांगुली यांनी आनंद व्यक्त केला. "आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि गेल्या काही वर्षांत माझे तिच्यासोबतचे नाते अधिक घट्ट झाले आहे." गांगुली यांनी दिल्लीसाठी मजबूत आणि निर्भय संघ तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे.

ऋषभ पंत पुन्हा दिल्लीच्या ताफ्यात

आयपीएल 2027 मध्ये सौरव गांगुली यांना अक्षर पटेल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. ऋषभ पंतने दोन हंगाम लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले. मात्र, आयपीएल 2026 नंतर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये झालेल्या ट्रेडमुळे पंत पुन्हा दिल्लीच्या संघात परतला आहे. या ट्रेडमध्ये पंतने 12 कोटी रुपयांचे वेतन स्वीकारत दिल्लीमध्ये पुनरागमन केले, तर फिरकीपटू कुलदीप यादव 13.5 कोटी रुपयांच्या करारासह लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झाला. हे ही वाचा -

IND vs WI 1st T20 LIVE Streaming : हॉटस्टार की सोनीलिव्ह... भारत-वेस्ट इंडिजचा पहिला टी-20 सामना फ्री मध्ये कुठे पाहायचा? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही