Sophie Devine WPL 2026 history : महिला प्रीमियर लीग 2026 (WPL 2026) हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली. नवीन हंगामातील पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि रोमांचक पद्धतीने संपला. तेव्हापासून, प्रत्येक सामन्यात जबरदस्त एंटरटेनमेंट पाहायला मिळत आहे. विशेषतः गुजरात जायंट्स या संघाने आपल्या तुफानी फलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. पहिल्या सामन्यात 213 धावा ठोकल्यानंतर पुढील सामन्यातही त्यांनी 200 चा टप्पा ओलांडला. मात्र या सामन्यातील खरी जादू दाखवली ती संघाची स्टार ओपनर सोफी डिव्हाईन हिने, जिने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि WPL च्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला.
डिवाय पाटील स्टेडियमवर धावांचा पाऊस
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी, 11 जानेवारी रोजी खेळल्या गेलेल्या WPL 2026 च्या चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. दोन्ही संघ एक दिवस आधीच मैदानात उतरले होते. गुजरातने मागील सामन्यात यूपी वॉरियर्सवर विजय मिळवला होता, तर दिल्लीला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे गुजरातसमोर सलग दुसऱ्या विजयाची संधी होती आणि त्यासाठी फलंदाजांचे तुफानी प्रदर्शन गरजेचे होते.
WPL इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर
मागील हंगामापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारी न्यूझीलंडची माजी कर्णधार सोफी डिव्हाईन मैदानात उतरल्याबरोबरच आक्रमक मूडमध्ये दिसली. नेहमीप्रमाणे तिने गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. गेल्या नोव्हेंबरमध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेली राणा पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आली आणि डेव्हाईनने आक्रमक हल्ला केला. तिने सलग दोन चौकारांनी षटक सुरू केले आणि नंतर सलग चार षटकार मारून इतिहास रचला. WPL इतिहासात एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे.
सोफी डिव्हाईनचे विक्रमी पराक्रम
या वादळी खेळीच्या जोरावर सोफी डिव्हाईनने अवघ्या 25 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही तिचा आक्रमक खेळ सुरूच राहिला. WPL मधील पहिले शतक करणारी फलंदाज ठरेल, असे वाटत असतानाच 11व्या ओव्हरमध्ये नशीब फसले. षटकारासह शतक पूर्ण करण्याच्या नादात ती 95 धावांवर बाद झाली. तिने फक्त 42 चेंडूमध्ये 95 धावा कुटल्या, ज्यात 7 चौकार आणि 8 प्रचंड षटकार होते. या खेळीसह ती WPL मध्ये दोन वेळा ‘नर्व्हस नाईंटीज’मध्ये बाद होणारी पहिली फलंदाज ठरली. यापूर्वी 2023 मध्ये RCB कडून खेळताना ती 99 धावांवर बाद झाली होती. इतकेच नव्हे, तर एका डावात दोन वेळा 8 षटकार मारणारी पहिली फलंदाज बनण्याचा मानही तिने पटकावला.
हे ही वाचा -
