Solapur royals, MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेला 15 जूनपासून शुभारंभ होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडली. पुणे, सोलापूरसह सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. सोलापूर रॉयल्स संघाने आपले मुख्य प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज चमिंडा वास याची नियुक्ती केली आहे. सोलापूर रॉयल्स आणि चामिंडा वास यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.
कपिल सन्स एक्स्प्लॉजिव यांनी सात कोटी रुपयांमध्ये सोलापूर संघाची मालकी आपल्या नावे केली होती. सोलापूर संघाला आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे पाठबळ आहे. एमपीएल स्पर्धा 15 जून ते 29 जून यादरम्यान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानात खेळविली जाणार आहे.
कोणत्या संघाचा कोण आयकॉन ?
ऋतुराज गायकवाड (पुणेरी बाप्पा), केदार जाधव (कोल्हापूर टस्कर्स); राहुल त्रिपाठी (ईगल नाशिक टायटन्स) राजवर्धन हंगरगेकर (छत्रपती संभाजी किंग्स, अझीम काझी (रत्नागिरी जेट्स), विकी ओत्सवाल (सोलापूर रॉयल्स) यांना यापूर्वीच आयकॉन खेळाडू म्हणून निवडलेय.
सोलापूर रॉयल्सचे शिलेदार कोण ? –
विकी ओस्तवाल, सत्यजित बच्छाव, ओमकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, संकेत फराटे, प्रवीण देशेट्टी, अथर्व काळे, यश नहार, मेहुल पटेल, यासर शेख, देव दी नाटू, अभिनव भट, स्वप्निल फुलपगार, विशांत मोरे, रिषभ राठोड.