SL vs AUS: श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला (Sri Lanka vs Australia) एका पाठोपाठ एक धक्के बसत आहे. पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-1 नं आघाडी घेऊन मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला ट्रेविस हेडच्या (Travis Head) रुपात मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळं ट्रेविस हेड मालिकेतून बाहेर पडलाय. ट्रॅव्हिस हेडला हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळं कोलंबो येथे होणार्‍या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आलंय. कसोटी मालिकेची विचार करता ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी चिंतेचं कारण आहे. येत्या बुधवारीपासून श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ट्रेविस हेडकडं दुखापतीतून सावरण्यासाठी केवळ सहा दिवस आहेत. या सामन्यापूर्वी तो दुखापतीतून सावरला नाहीतर, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मधल्या फळीत बदल करावा लागणार आहे.


ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी श्रीलंकेचा दौरा खराब ठरलाय. एकदिवसीय मालिका सुरु असताना ऑस्ट्रेलियाच्या तब्बल आठ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. श्रीलंका आणि भारत यांच्यात अखेरचा एकदिवसीय सामना उद्या म्हणजेच 24 जून रोजी खेळला जाणार आहे. हा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेतील बदला घेण्याचा प्रयत्न करेल. परंतु, कसोटी मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या आठ खेळाडूंना दुखापत झाली. 


पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ:
आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिच मार्श, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, झाय रिचर्डसन, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवूड. 


पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी श्रीलंकेचा संभाव्य संघ:
निरोशन डिकवेला, पाथुम निसांका, चारिथ असलंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, जेफ्री वेंडरसे, महेश थेकशाना. 


हे देखील वाचा-