Shubman Gill Test Captain : गंभीरने शुभमनला कर्णधार बनवलं खरं, पण डाव उलटा पडणार? गिलचा परदेशातील रेकॉर्ड खराब, 59 इनिंगमध्ये फक्त...
Shubman Gill Test Captain Team India Squad For England Tour 2025 : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आलीय. तर ऋषभ पंत भारताचा उपकर्णधार असेल.

India Squad For England Tour 2025 : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आलीय. विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसदार कोण याचं उत्तर आज बीसीसीआयच्या बैठकीत देण्यात आलं. शुभमन गिल भारताचा पुढचा कर्णधार असेल तर ऋषभ पंत भारताचा उपकर्णधार असेल. टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चौथ्या क्रमांकावर म्हणजे विराटच्या जागेवर कोण फलंदाजी करणार याचा निर्णय कोच गंभीर आणि कर्णधार गिल यांच्याकडे सोपवण्यात आली.
Say Hello to #TeamIndia's newest Test Captain 👋@ShubmanGill pic.twitter.com/OkBmNZT5M0
— BCCI (@BCCI) May 24, 2025
तर जसप्रीत बुमराह मात्र सर्व पाच कसोटी खेळू शकणार नाहीये. गेल्या काही दिवसांत चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला संधी मिळालीय. तर करुण नायरनेही कमबॅक केलाय. तर तंदुरूस्त नसलेला मोहम्मद शमी इंग्लंड दौऱ्यावर जाणार नाही. साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, नीतिशकुमार रेड्डीलाही संधी मिळालीय.
गंभीरने शुभमनला कर्णधार बनवलं खरं, पण डाव उलटा पडणार?
शुभमन गिलचा रेड बॉल क्रिकेटमध्ये असलेला विक्रम पाहता, केवळ कर्णधार म्हणून त्याची कसोटी लागेल असे म्हणता येणार नाही. संघ चालवण्यासोबतच त्याला फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करावे लागेल. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये 59 डावांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1893 धावा केल्या आहेत. भारताबाहेर त्याची सरासरी 30 देखील नाही.
Shubman Gill-led #TeamIndia are READY for an action-packed Test series 💪
— BCCI (@BCCI) May 24, 2025
A look at the squad for India Men’s Tour of England 🙌#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/y2cnQoWIpq
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सोडले तर शुभमन गिलची कामगिरी कॅरिबियन देशांमध्येही निराशाजनक राहिली आहे. आशिया खंडाबाहेर त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्याला चार वर्षे झाली आहेत. त्याने इंग्लंडमध्ये 3 कसोटी सामनेही खेळले आहेत. त्याने 6 डावांमध्ये 14.66 च्या सरासरीने 88 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्याने 2 सामन्यांच्या 4 डावात 18.50 च्या सरासरीने 74 धावा केल्या आहेत. कॅरिबियन देशांमध्ये त्याने 2 कसोटी सामन्यांच्या 3 डावात 22.50 च्या सरासरीने 45 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 35 सरासरी
शुभमन गिलने ऑस्ट्रेलियामध्ये 352 धावा केल्या आहेत, परंतु त्याने 11 डाव खेळले आहेत. सरासरी 35.20 आहे. शुभमन गिलच्या बचावात असे म्हणता येईल की त्याने ऑस्ट्रेलिया वगळता इतर कोणत्याही देशात जास्त सामने खेळलेले नाहीत, परंतु जर आपण ऋषभ पंत आणि यशस्वी जौस्वाल यांचे रेकॉर्ड पाहिले तर आपल्याला कळेल की गिलचे रेकॉर्ड किती सामान्य आहेत. यशस्वीने ऑस्ट्रेलियामध्ये 43.44 आणि कॅरिबियन देशांमध्ये 88.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्याची सरासरी 12.50 आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ (Team India Squad For England Tour 2025)
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
















